इतिहास

कृष्णधवल फोटोग्राफी : सन १८७५ मधे जोसेफ बेगलरला दिसलेला सांची स्तुप

भारतावर ब्रिटिशांनी राज्य केले पण त्याच बरोबर त्यांनी इथला विकास ही केला. शिक्षणाची गंगा भारतात आणून समाजसुधारणेचे मोठे काम केले. भारताचा दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास जगापुढे आणला. सारनाथ, सांची, बोधगया अशा अनेक पुरातन स्थळांचा जीर्णोद्धार ब्रिटिशांच्या कालावधीमध्ये झाला आणि त्याचे सर्व श्रेय लष्करी अभियंता आणि पुरातत्व खात्याचे संचालक अलेक्झांडर कनिहँगम आणि त्यांच्या टीमचे आहे.

त्यांचा एक सहाय्यक होता. त्याचे नाव जोसेफ डेव्हिड बेगलर. हा सुद्धा एक इंडो-अमेरिकन अभियंता, पुरातत्ववेत्ता आणि फोटोग्राफर होता. ब्रिटिश- इंडियासाठी काम करताना त्याने मध्य भारतातील अनेक पुरातन स्थळांची छायाचित्रे डब्बा कॅमेऱ्याने काढली. १८७५ साली तो सर्व्हे करण्यासाठी सांचीच्या टेकडीवर गेला होता. तेव्हा त्याने तेथील स्तुपाच्या विखुरलेल्या अवशेषांचे छायाचित्र टिपले. प्रस्तुत छायाचित्रात अशोकस्तंभाची झालेली पडझड दिसून येते.

हे पण वाचा : कृष्णधवल फोटोग्राफीचा इतिहास आणि ब्रिटिशांनी भारतातील बौद्ध लेणींचे काढलेले फोटो

सर अलेक्झांडर कनिहँगम व त्यांच्या टीमचे योगदान भारतातील बहुजन समाज कधीच विसरणार नाही. कारण त्यांच्याच मुळे विस्मरणात गेलेला बुद्ध जगापुढे पुन्हा प्रगट झाला.

– संजय सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *