इतिहास

संत तुकाराम बौद्ध लेण्यांमध्ये जाऊन ध्यान करीत

संत तुकाराम देहूजवळच्या भंडारा आणि भांबनाथ या डोंगरांवर जाऊन ध्यान करीत असत, हे प्रसिद्धच आहे. या डोंगरांवर ते ज्या ठिकाणी ध्यान करीत, ती ठिकाणे ही बौद्ध लेणी आहेत, हे अगदी स्पष्ट आहे . आजही भंडारा डोंगराच्या उतारावर कपाट म्हटल्या जाणा-या ठिकाणी बौद्ध लेण्यासमोर बौद्ध स्तूप आहे, अन्यत्र स्तूपांसमोर असतो तसा जलकुंड आहे. तुकाराम या लेण्यातच ध्यान करीत असत. त्यांच्या पत्नी जिजाबाई तेथेच त्यांचे जेवण घेऊन जात असत. तुकारामांनी भांबनाथाच्या डोंगरावर बौद्ध लेण्यातच ध्यान केले होते.

या ध्यानाच्या प्रसंगीच त्यांना साक्षात्कार झाला होता. हा साक्षात्कार कोणत्याही प्रकारे गूढ वा अलौकिक स्वरूपाचा नव्हता. या साक्षात्कारानंतरच त्यांनी त्यांच्या वाडवडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून लोकांना कर्जमुक्त केले होते.

बुद्धांनी आपले राजवैभव, विपुल शेती, घरदार सोडून आपल्या मुख्य जीवनप्रवासाला सुरुवात केली होती. तुकारामांनी कर्जखते इंद्रायणीत बुडवून लोकांना कर्जमुक्त केले आणि आपल्या सर्वोच्च ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. दोघांनीही आपल्या वैभवाचे स्वत:च विसर्जन केले.

संदर्भ : तथागत बुद्ध आणि संत तुकाराम – लेखक: डॉ.आ.ह.साळुंखे

One Reply to “संत तुकाराम बौद्ध लेण्यांमध्ये जाऊन ध्यान करीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *