ब्लॉग

नवीन स्तूप बांधण्या अगोदर जुन्या ऐतिहासिक स्तूपांचे जतन करा

ट्रायसायकल नावाचे एक मासिक आहे. या मासिकातला ‘Ladakh Is Bringing New Love to Old Stupas’ नावाचा लेख नुकताच वाचनात आला. लडाख मध्ये सुद्धा अनेक स्तूप दऱ्याखोऱ्यात विखुरलेले आहेत. हवामान बदलामुळे , पावसामुळे, ग्लोबलायझेशनमुळे, होत असलेल्या आधुनिक प्रगतीमुळे आणि सर्वसाधारण दुर्लक्षामुळे तसेच स्तुपाबाबतच्या अज्ञानांमुळे अनेक स्तूप नष्ट होत चालले होते.

अशा वेळी लडाखमध्ये हिमालयन कल्चरल हेरिटेज फाउंडेशन संस्था २००९ मध्ये स्थापन झाली. याचे संचालक डॉक्टर सोनम वांगचोक असून त्यांनी आतापर्यंत ४० स्तुपांची दुरुस्ती केली आहे. या कामासाठी त्यांनी खास १६ कुशल कारागिरांची टीम तयार केली आहे.

मि.वांगचोक यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. ते म्हणतात “Our heritage is our identity”. माननीय धर्मगुरू दलाई लामा यांनी सुद्धा म्हटले आहे की नवीन स्तूप बांधण्या अगोदर जुन्या ऐतिहासिक स्तूपांचे जतन करा /नूतनीकरण करा.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *