बातम्या

जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन

नागपूर – जेष्ठ आंबेडकरी साहित्यिक डॉ. भाऊ लोखंडे यांचे निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, रिपब्लिकन स्टुडंट्स फेडरेशनचे प्रणेते आणि बौद्ध दलित साहित्याच्या चळवळीत महत्वाचे योगदान असलेले डॉ. भाऊ लोखंडे हे आंबेडकरवादी विचारवंत होते. त्यांचा जन्म १५ जून १९४२ रोजी झाला होता.

डॉ. भाऊ लोखंडे हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील पदव्युत्र पाली प्राकृत विभागाचे माजी रिडर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख होते. याशिवाय, त्यांनी अनेक संस्थ्यांच्या कार्यकारिणीत विविध पदांवर काम केले आहे. विदर्भ साहित्य संघ दलित साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. साभार : लोकमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *