ब्लॉग

मुंबईत अनेकांना हे जपानी बौद्ध विहार ज्ञात नाही…तुम्हाला माहिती आहे का?

‘निप्पोन्झान म्योहोजी’ ही महायान निचिरेन बौद्ध परंपरेची जपानी संस्था असून ती जगामध्ये शांती स्थापित व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत असते व त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी जगात सर्वत्र शांती स्तूप उभारले आहेत. या संस्थेचे मुख्य प्रवर्तक निचीदास्तू फुजी गुरुजी यांनी पहिल्या महायुद्धानंतर व भारत स्वातंत्र लढा दरम्यान सन १९३० नंतर अनेकदा भारतास भेट दिली व बुद्धाच्या शांती संदेशाचा सर्वत्र प्रसार केला. त्याच दरम्यान मुंबईत वरळी येथील पोद्दार हॉस्पिटल समोरील एक उंच टेकडीखाली उत्तरदिशासमूख जपानी बुद्ध विहार त्यांनी स्थापन केले. त्यानंतर उद्योजक जुगल किशोर बिर्ला यांनी सद्यस्थीतीतील दगडी बांधकाम असलेले बौद्ध विहार बांधले. आता या बौद्धविहारास ६३ वर्षे झाली आहेत. परंतु मुंबईत बऱ्याच जणांना हे जपानी बौद्ध विहार ज्ञात नाही. येथील बुद्धमूर्ती ही सफेद संगमरवरी दगडातील असून अतिशय सुंदर आहे. या विहाराचे बांधकाम चैत्यागृहा प्रमाणे अतिशय देखणे आहे.

सध्या येथील विहारामधील पूजाअर्चा व विहाराची देखभाल ‘निप्पोन्झान म्योहोजी’ ट्रस्ट अंतर्गत भन्तेजी ‘टी मोरिता’ १९७६ पासून करीत आहेत. त्यांना हिंदी भाषा चांगली येत असून विहाराचे प्रमुख म्हणून मुंबईतील अनेक सामाजिक कार्यात, शांती पदयात्रेत व मुंबईच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आहे. मुंबईतील जपानी नागरिक, बौद्ध अभ्यासक, पर्यटक व इतर सर्व समाजातील अनेक मान्यवर पौर्णिमेस येथील बौद्ध विहारात दर्शनार्थ येत असतात.

*भिवंडीतील शिरोळा गावाजवळील शांति स्तूप*Shanti Stupa near Bhiwandi in Thane Dist.'निप्पोन्झान म्योहोजी' ही महायान निचिरेन बौद्ध परंपरेची जपानी संस्था असून ती जगामध्ये शांती स्थापित व्हावी यासाठी सतत प्रयत्न करीत असते व त्याचे प्रतीक म्हणून त्यांनी जगात सर्वत्र शांती स्तूप उभारले आहेत. या संस्थेचे मुख्य प्रवर्तक निचीदास्तू फुजी गुरुजी यांनी पहिल्या महायुद्धानंतर व भारत स्वातंत्र लढा दरम्यान सन १९३० नंतर अनेकदा भारतास भेट दिली व बुद्धाच्या शांती संदेशाचा सर्वत्र प्रसार केला. त्याच दरम्यान मुंबईत वरळी येथील पोद्दार हॉस्पिटल समोरील एक उंच टेकडीखाली उत्तरदिशासमूख जपानी बुद्ध विहार त्यांनी स्थापन केले. त्यानंतर उद्योजक जुगल किशोर बिर्ला यांनी सद्यस्थीतीतील दगडी बांधकाम असलेले बौद्ध विहार बांधले. आता या बौद्धविहारास ६३ वर्षे झाली आहेत. परंतु मुंबईत बऱ्याच जणांना हे जपानी बौद्ध विहार ज्ञात नाही. येथील बुद्धमूर्ती ही सफेद संगमरवरी दगडातील असून अतिशय सुंदर आहे. या विहाराचे बांधकाम चैत्यागृहा प्रमाणे अतिशय देखणे आहे. सध्या येथील विहारामधील पूजाअर्चा व विहाराची देखभाल 'निप्पोन्झान म्योहोजी' ट्रस्ट अंतर्गत भन्तेजी 'टी मोरिता' १९७६ पासून करीत आहेत. त्यांना हिंदी भाषा चांगली येत असून विहाराचे प्रमुख म्हणून मुंबईतील अनेक सामाजिक कार्यात, शांती पदयात्रेत व मुंबईच्या सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला आहे. मुंबईतील जपानी नागरिक, बौद्ध अभ्यासक, पर्यटक व इतर सर्व समाजातील अनेक मान्यवर पौर्णिमेस येथील बौद्ध विहारात दर्शनार्थ येत असतात. अशा या 'निप्पोन्झान म्योहोजी' संस्थेने मुंबई-ठाणे शहराजवळ भिवंडी येथे शिरोळा गावाजवळील एका टेकडीवर भव्य शांतिस्तूप बांधण्याचे काम हाती घेतले आहे.त्यासाठी १६ एकर जमीन तेवीस वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली. सर्व मंजुऱ्या मिळवून तसेच ठाण्याच्या शासकीय कारभाराचा अनुभव घेत आतापर्यंत प्लिथं लेव्हल पर्यंत स्तूपाचे बांधकाम करण्यात आले आहे. भन्तेजींनी याबाबत खूपच मेहनत घेतली आहे. मात्र आता निधीअभावी पुढील बांधकाम थांबले असून निधी प्राप्त झाल्यावर ते सुरू करण्यात येईल असे भन्तेजी टी मोरिता यांनी सांगितले. या भिवंडी स्तूपाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील १६ एकर वनराई असलेल्या जागेत शांती पॅगोडा, विहार, शिशुघर, मृगवन, कमळ सरोवर, पदपथ, मेडिटेशन रूम व माहिती केंद्र उभारले जाणार आहे. येथील बांधकामासाठी दगड, वीटा, माती प्लॅस्टर, लाकडी तुळव्या व स्तंभ अशा उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर केला जाणार आहे. तरी भारतीयांनी या बौद्ध शांतीस्तूपाच्या बांधकामासाठी मदत करावी असे भन्तेजी टी मोरिता यांनी आव्हान केले आहे. स्तूपाच्या बांधकामासाठी दान करणे म्हणजे खूप पुण्य अर्जित करणे होय. मानवी आयुष्यात स्तूपासाठी दान करण्याची संधी क्वचितच प्राप्त होत असते. तरी या कामासाठी दान करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या संस्थेच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी. यापासून आयकरात सूटही प्राप्त होते. व दानाची नंतर रीतसर पावती देण्यात येते. तसेच कुणास बांधकामाबाबत प्रत्यक्ष मदत करावयाची असल्यास खाली दिलेल्या वेळेत भंतिजींची भेट घ्यावी. तरी भिवंडी शांतिस्तुप लवकरात लवकर बांधून पूर्ण होवो व एकेकाळी बौद्ध संस्कृती असलेले ठाणे-कल्याण या स्तुपामुळे पुन्हा नावारूपास येवो अशी आपण प्रार्थना करूया. Bank :- The United Bank of India, Worli Branch(0375)Account Holder :- NIPPONZAN MYOHOJI Account No. 0375010105549IFSC Code :- UTBIOWOR609MICR Code :- 40027013Pan No.:- AAATN0359Fजपानी बौद्ध विहार पत्ता :-जपानी बौद्ध विहार, ऍनी बेझंट रोड, पोद्दार हॉस्पिटल समोर, वरळी, मुंबई- १८ ( सकाळी ६.०० ते ११.०० व दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत चालू )— संजय सावंत ( नवी मुंबई )www.nipponzanmyohojimumbai.com⚛⚛⚛

Posted by Sanjay Sawant on Tuesday, December 31, 2019

अशा या ‘निप्पोन्झान म्योहोजी’ संस्थेने मुंबई-ठाणे शहराजवळ भिवंडी येथे शिरोळा गावाजवळील एका टेकडीवर भव्य शांतिस्तूप बांधण्याचे काम हाती घेतले आहे.त्यासाठी १६ एकर जमीन तेवीस वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आली. सर्व मंजुऱ्या मिळवून तसेच ठाण्याच्या शासकीय कारभाराचा अनुभव घेत आतापर्यंत प्लिथं लेव्हल पर्यंत स्तूपाचे बांधकाम करण्यात आले आहे. भन्तेजींनी याबाबत खूपच मेहनत घेतली आहे. मात्र आता निधीअभावी पुढील बांधकाम थांबले असून निधी प्राप्त झाल्यावर ते सुरू करण्यात येईल असे भन्तेजी टी मोरिता यांनी सांगितले. या भिवंडी स्तूपाचे वैशिष्ट्य म्हणजे येथील १६ एकर वनराई असलेल्या जागेत शांती पॅगोडा, विहार, शिशुघर, मृगवन, कमळ सरोवर, पदपथ, मेडिटेशन रूम व माहिती केंद्र उभारले जाणार आहे. येथील बांधकामासाठी दगड, वीटा, माती प्लॅस्टर, लाकडी तुळव्या व स्तंभ अशा उपलब्ध नैसर्गिक साहित्याचा वापर केला जाणार आहे. तरी भारतीयांनी या बौद्ध शांतीस्तूपाच्या बांधकामासाठी मदत करावी असे भन्तेजी टी मोरिता यांनी आव्हान केले आहे.

स्तूपाच्या बांधकामासाठी दान करणे म्हणजे खूप पुण्य अर्जित करणे होय. मानवी आयुष्यात स्तूपासाठी दान करण्याची संधी क्वचितच प्राप्त होत असते. तरी या कामासाठी दान करण्याची इच्छा असल्यास खाली दिलेल्या संस्थेच्या बँक खात्यात रक्कम जमा करावी. यापासून आयकरात सूटही प्राप्त होते. व दानाची नंतर रीतसर पावती देण्यात येते. तसेच कुणास बांधकामाबाबत प्रत्यक्ष मदत करावयाची असल्यास खाली दिलेल्या वेळेत भंतिजींची भेट घ्यावी. तरी भिवंडी शांतिस्तुप लवकरात लवकर बांधून पूर्ण होवो व एकेकाळी बौद्ध संस्कृती असलेले ठाणे-कल्याण या स्तुपामुळे पुन्हा नावारूपास येवो अशी आपण प्रार्थना करूया.

Bank :- The United Bank of India, Worli Branch(0375)
Account Holder :- NIPPONZAN MYOHOJI
Account No. 0375010105549
IFSC Code :- UTBIOWOR609
MICR Code :- 40027013
Pan No.:- AAATN0359F

जपानी बौद्ध विहार पत्ता :-
जपानी बौद्ध विहार, ऍनी बेझंट रोड, पोद्दार हॉस्पिटल समोर, वरळी, मुंबई- १८ ( सकाळी ६.०० ते ११.०० व दुपारी ४.०० ते संध्याकाळी ७.३० पर्यंत चालू )
www.nipponzanmyohojimumbai.com

– संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *