बाळ गंगाधर टिळक यांचे सुपुत्र श्रीधरपंत हे समतावादी विचारांचे समर्थक आणि युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी होते.चवदार तळयाच्या सत्याग्रहास त्यांनी पाठिंबा दिला होता जर का ते अधिक आयुष्य जगले असते तर तर बाबासाहेबांच्या चळवळीतील चित्र काही औरच असते.बाबासाहेबांच्या वैचारिक प्रेरणेने श्रीधरपंत यांनी पुण्यातील टिळक वाडयात 8 एप्रिल 1928 रोजी समाज समता संघाची शाखा सुरु केली आणि त्याचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते तर उपाध्यक्ष श्रीधरपंत टिळक होते.
बाबासाहेबांच्या हस्ते टिळक वाडयात या कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर श्रीधरपंतानी अस्पृश्यांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. बाबासाहेब व इतर कार्यकर्ते भोजनाचा आस्वाद घेत असतानाच काही कर्मट लोकांनी जाणून बुजून वीजपुरवठा खंडित केला.कर्मट लाट्या-काट्या घेऊन आले होते.दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती,श्रीधरपंतानी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली.शेवटी गोड्या तेलाच्या दिव्याच्या प्रकाशमानात हा क्रांतीकारक स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पाडला.
(टिप : सद्याचा टिळकवाड्याचे पूर्वी नाव गायकवाड वाडा होते कारण हा गायकवाडा बडोदा संस्थानाचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या मालकीचा होता.1905 मध्ये सयाजीराव महाराजांनी हा वाडा बाळ गंगाधर टीळकांना विकला की असाच दिला हा अभ्यासाचा विषय आहे.गायकवाड वाडयाचे नाव नंतर केसरी वाडा आणि सद्याचा टिळक वाडा अस नामांतर करण्यात आले.)
सरते शेवटी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गायकवाड्याला वंदन करून करून निरोप घेतला.
प्रविण साळुंके
नालासोपारा(बुद्धभूमी)