इतिहासात एकुण चार सिदनाक महार होऊन गेले आहेत.त्या पैकी पहिले सिदनाक महार हे बहमनी काळात सेनापती होऊन गेले होते. त्यानंतर दुसरे सिदनाक महार हे अहमदनगर च्या निजामशाही च्या काळात सरदार होऊन गेले आहेत. त्यानंतर तिसरे सिदनाक महार हे छत्रपती शाहू महाराज यांचे काळात होऊन गेले होते.
जेव्हा शाहु महाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आले होते. त्यांतर झालेल्या वारसाहक्काच्या लढाईत संताजी घोरपडे, धनाजी जाधव आणि बाळाजी विश्वनाथ यांच्या सोबतच सिदनाक महार तिसरे यांनी सुद्धा पराक्रम गाजवला होता म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक सरदारांना आपापल्या योग्यतेनुसार शस्त्रं अलंकार देऊन सत्कार केला होता तेव्हा सिदनाक महार तिसरे यांचा ही योग्य पद्धतीने सत्कार केला व मौजे कळंबी हे सातारा जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील मिरज प्रांत (आता सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक) गाव इनाम दिले होते. आणि चौथे सिदनाक महार हे सवाई माधवराव पेशव्याच्या काळात होऊन गेले.१७९५ सालात खर्ड्याच्या लढाईतील प्रसंग
‘…….एका सरदाराच्या तंबू जवळ सिदनाकाचा तंबु असल्याने त्या सरदाराने पेशव्यांजवळ सिदनाकाचा तंबु हटवण्याची तक्रार केली.त्यावर पेशव्यांनी सरदार पाटणकरांना हा न्याय करण्यासाठी सांगितले. त्यावेळी हिरोजी पाटणकर या वयोवृद्ध मराठा सरदारांनी बजावले की “ही तलवार धरणार्या वीरांची पंगत आहे ही जेवणाची पंगत नाही. ‘ज्याची तलवार खंबीर तो हंबीर’ सिदनाक महार यांचा तंबु इथेच राहणार.”
या सरदार पाटणकरांच्या निकालावर सवाई माधवराव पेशव्याच्या सोबत सर्वांनीच माना डोलावल्या. नंतर रणांगणावर भयंकर युद्ध पेटले पेशव्यांचे सरदार परशुराम भाऊ पटवर्धन यांना निजामाच्या सैन्यातील पठाणांनी घेरले.त्यावेळी सिदनाक महार यांनी पठाणांवर झेप घेतली आणि पठाणांना कंठस्नान घातल्यावर परशुराम भाऊ पटवर्धन यांना वाचवलं.’असे हे चौथे सिदनाक महार. यांचं सिदनाक महार यांचे वंशज शामराव कांबळे हे मौजे वेलंग पो.शिरंबे ता.कोरेगांव जी सातारा येथे राहतात.
टीप: वरील माहिती दुय्यम संदर्भावरुन घेतली आहे. मुळ संदर्भाचा उल्लेख सदर पुस्तकात आहे.
संदर्भ :-
१)अस्पृश्यांचा लष्करी पेशा ले. चांगदेव भवानराव खैरमोडे
२) भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न.ले.विठ्ठल रामजी शिंदे.
३) महाराष्ट्रातील महारांचा इतिहास .ले. शंकरराव रामजी खरात.
४) शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास.ले. डॉ अनिल कठारे.
– मनोजराव गवई