बाबासाहेबांच्या प्रेमळपणाच्या पुष्कळ गोष्टी सांगता येतील. एक प्रसंग असा होता, पहाटेची वेळ होती, पाच वाजले असतील, आमच्या परळच्या शाळेच्या दारातून “अहो दोंदे, अहो दोंदे,” असे कुणीतरी हाका मारीत होते. डॉक्टर यावेळी इकडे कुठे? मला आश्चर्य वाटले, “अहो दोंदे, मी चहा प्यायला आलो आहे’ असे बोलतच ते जिना चढले, येऊन बसल्यावर मी सहजच येण्याचे कारण विचारले, ते म्हणाले, “असे झाले, आमच्या हिंदू कॉलनीमध्ये काम करणारी भंगीन रात्री दोन वाजता मला उठवायला आली.
तिच्या नव-याला आदल्या दिवशीच्या संध्याकाळपासून जुलाब-ओकाऱ्या होत होत्या. संध्याकाळी सात वाजता ती आपल्या नव-याला इस्पितळात घेऊन गेली. सात वाजल्यापासून तो रात्रीचे दोन वाजेपर्यंत त्यांनी दादच लागली नाही. तो बाहेरच पडून होता. मी डॉ. जीवराजला सांगावे म्हणून ती मला उठवायला आली. मी मोटारगाडी काढली आणि त्या बाईबरोबर इस्पितळात गेलो. त्या मनुष्याची सोय लावली आणि जाता-जाता तुमच्याकडे डोकवावे असे माझ्या मनात आले, म्हणून तुम्हाला हाका मारल्या. “एके सायंकाळी बाबासाहेब फिरायला निघाले, कडक थंडी पडली होती. वाटेत त्यांना एक अगदी म्हातारा गृहस्थ आढळला. त्याच्या अंगावर जीर्ण व फाटके कपडे होते. अर्धनग्न होता तो. एका पुलाला टेकून तो थंडीत कुडकुडत उभा होता. त्याचे हातपाय लटलटत होते. ती अवस्था पाहून बाबासाहेब थबकले.
अंगावरचा गरम उंची कोट काढला आणि आपल्या हातांनी त्यांनी त्या म्हाता-याच्या अंगावर तो कोट चढवला. मग त्याला अलिंगन देऊन ते पुटपुटले, “या जगात असे कितीतरी लोक थंडीत गारठून मरत आहेत. कितीतरी लोक उपासानं तडफडत मरत आहेत. स्वत:ला जे शक्य आहे ते करीत जा.”
एके दिवशी त्यांचा कुत्रा काही खाईना, काही पिईना. बाबासाहेब फारच अस्वस्थ झाले. हवे ते इलाज केले. त्याला हृदयाशी कवटाळून करूण शब्दात ते म्हणाले, असे काय झाले तुला? तुझा हा सत्याग्रह कशासाठी आहे? हे उपोषण कशासाठी? सांग बाबा, सांग” बाबासाहेबांचे डोळे पाणावले. आपला प्रेमळ विश्वासू कुत्रा काहीच खात नाही म्हणून तेही दोन दिवस उपाशीच राहिले आणि तिस-या दिवशी सकाळी जेव्हा कुत्र्याने दुधाबरोबर पाव खाल्ला तेव्हा बाबासाहेब आनंदून गेले. प्राणिमात्रावरील ही उदात्त दया, निष्ठा!
माझी आत्मकथा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
It’s really very helpful for others it’s great person there is no one born in this world
Jay bhim
Nice story Dr babasaheb
Good information about Dr. Babasaheb Ambedkar.
बहुत अच्छी जानकारी आपने जुटाई है !
सहर्ष धन्यवाद!
हि माहिती गरजेची आहे
Jay bhim very rare information you share on this site thank you very much for this very important things brother we know about Babasaheb but other cast person’s didn’t have any knowledge