जगभरातील बुद्ध धम्म

पासष्ट वर्षाचा सुळेधारी हत्ती; सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूस शस्त्रधारी सुरक्षारक्षक असतात

‘नादंगमूवा राजा’ हे नाव सिरिलंकेतील एका पासष्ट वर्षाच्या सुळेधारी हत्तीचे असून तो साडेदहा फूट उंच आहे. हा श्रीलंकेतील सर्वात उंच व भारदस्त गजराज आहे. बुद्ध दंत अस्थींची जेव्हा मिरवणूक निघते तेव्हा या गजराजाच्या पाठीवरील अंबारीत बुद्ध दंत अस्थीं ठेवण्यात येतात.

असा हा धिप्पाड गजराज जेव्हा श्रीलंकेतील रस्त्यावरून चालतो तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूस शस्त्रधारी सुरक्षारक्षक असतात. या गजराजाने आतापर्यंत कित्येक किलोमीटर प्रवास कॅण्डी येथील जंगलातून केला आहे. तो दररोज फेरफटका मारण्यास बाहेर निघतो तेंव्हा त्याला बघण्यासाठी दररोज असंख्य पर्यटकांची गर्दी होते.

– संजय सावंत, नवी मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *