बातम्या

बहुचर्चित ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; रिचा चड्ढा दलित मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत

अभिनेत्री रिचा चड्ढा हिची प्रमुख भूमिका असणाऱ्या बहुचर्चित ‘मॅडम चीफ मिनिस्टर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. रिचा चड्ढा हिने पहिल्यांदाच एखादी आव्हानात्मक भूमिका साकारल्याचे ट्रेलर पाहताच लक्षात येते.

‘मॅडम चीफ मिनिस्टर’ च्या ट्रेलरमध्ये राजकारण अतुच्य पातळीवर पोहोचले असून सत्तेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचेही दिसते. जागावाटपावरूनही होणारे राजकारणही यात आपल्याला पाहता येणार आहे. तसेच समाजाने शोषण केलेल्या एक दलित मुलगी पुढे येते आणि स्वत:च्या बळावर मुख्यमंत्री बनते असे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.

चित्रपटात रिचा चड्ढा हिच्या व्यतिरिक्त सौरभ शुक्ला आणि मानव कौलही प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 22 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.