ब्लॉग

सुनिता द्विवेदी : बौद्ध स्तुपांच्या अभ्यासासाठी आशिया खंडात एकटीने केला थक्क करणारा प्रवास

सुनिता द्विवेदी या उत्तर भारतातील लेखिका व माजी पत्रकार आहेत.( TOI आणि Hindustan Times) त्यांचा जन्म कुशीनगर येथे झाला. भगवान बुद्ध यांचे महापरिनिर्वाण झाले त्या स्थळाजवळच त्यांचे घर आहे. घराच्या खिडकीतून ती पवित्र जागा त्यांना दिसत असे. लहानपणापासून तेथे वावरत असल्याने बुध्दाविषयी विशेष आत्मीयता वाटत असे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर त्या बुद्ध स्तुपाबद्दल लिहू लागल्या, बोलू लागल्या. तिचे कुटुंब बौद्ध नाही पण बुद्ध मनात रुजल्याने तिच्या वाणीतून, लेखणीतून बुद्ध कागदावर उतरू लागला.

कुशीनगर येथे भगवान बुद्धांनी आनंद यांना उद्देशिलेले शेवटचे वाक्य त्यांच्या मनात घर करून राहिले होते. ” या जगात काहीच नित्य नाही, तू स्वतः स्वतःचा दीप हो”. या ओळीने त्यांचे आयुष्य बदलले. बुद्ध स्तुपांच्या अभ्यासासाठी आशिया खंडातील सर्व देशात त्या फिरल्या. जेथे प्रवासी जात नाहीत अशा अवघड जागी जाऊन त्यांनी पो लिन मॉनेस्ट्री मधला ब्रॉन्झचा बुद्ध पुतळा पहिला, मजिशन मधली बुद्धमूर्ती बघितली, अलतीन-येमेल मधील खडकावरील बुद्ध वचने वाचली.

पाकिस्तान हे आपले शत्रूराष्ट्र असले तरी दीड-दोन हजार वर्षांपूर्वी ते मोठे बौद्ध केंद्र होते. सुनीता यांनी शेवटचा दौरा पाकिस्तानचा केला. एका महिलेने तेथे जाऊन एकांतवासात असलेली बौद्धस्थळे बघणे सुरक्षित नव्हते. पण गांधार आर्ट आणि कल्चरल असोसिएशनचे झुल्फिकार रहीम यांनी व्हिसा पासून स्थळे दाखविण्यापर्यंत मदत केली. ती पाकिस्तानमध्ये असताना इस्लामाबाद येथे दंगे चालू होते. पण बुध्दाविषयी मनात अपार श्रद्धा होती. न घाबरता अनेक पुरातन स्तूप व स्थळें बघितली. तिचे मन तिला सांगत असे की बुद्ध आपले सगळीकडे संरक्षण करीत आहे.

लाहोर म्युझियम मधील पुरातन बौद्ध वस्तूंचा खजिना बघितला. तक्षशिला, पेशावर, मर्दन येथील स्तूप / विहार / संघाराम बघितले. पेशावर म्युझियममध्ये उत्खननात सापडलेल्या काळ्या, जांभळ्या, राखाडी दगडातील मोठमोठ्या बुद्धमूर्ती बघीतल्या. गांधारशैली बाबत अनेक गोष्टी उजेडात आणल्या. बुद्धाबद्दल अपार श्रद्धा बाळगून एक भारतीय स्त्री स्तुपांच्या अभ्यासासाठी आशिया खंडात एकटीने यात्रा करते, हे खरेच कौतुकास्पद आहे.

सुनिता द्विवेदी यांची खालील पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

Buddha in Central Asia , Buddhist Heritage Site of India, In Quest of the Buddha : A Journey on the Silk Road.

One Reply to “सुनिता द्विवेदी : बौद्ध स्तुपांच्या अभ्यासासाठी आशिया खंडात एकटीने केला थक्क करणारा प्रवास

  1. Namo Buddhay. Sunita Dwiveddi ka aadarsh sabhi branhan aur rajput mahila ne lena chahiye.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *