भगवान बुद्ध आपली अंतिम चारिका करताना वैशालीतून पुढे जात जात पावा येथे पोहोचले. तेथे चुन्द नावाच्या लोहाराच्या आम्रवनांत थांबले. तेव्हा चुन्दाने त्यांना भिक्खूसंघासहित दुस-या दिवशीच्या भोजनाचे आमंत्रण दिले आणि स्वादिष्ट खीर वगैरे मिष्टान्नाबरोबरच सूकरमद्दवाचीही सिद्धता केली. भगवंतांनी चुन्दाच्या घरचे भोजन ग्रहण केले व चुन्दास धर्मोपदेश करून ते निघाले. परंतु चुन्दाने दिलेले भोजन भगवंतांच्या प्रकृतीस मानवले […]