इतिहास

नालंदा विद्यापीठाचा अध्यापक आर्यभट

‘नालंदा’ या जगप्रसिद्ध विद्यालयाची स्थापना आणि भरभराट गुप्तकाळात झाली. गुप्त सम्राटांनी त्याकाळी ‘नालंदा’ विद्यापीठाला भरभरून अर्थसहाय्य केले. ‘नालंदा’ हे प्रामुख्याने बौद्ध धम्माच्या शिक्षणाचे केंद्र होते. त्याचबरोबर तेथे इतरही विषयांचे शिक्षण दिले जात होते. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ आर्यभट याचा जन्म इसवी सन ४७६ मध्ये इथेच झाला. त्याचे सर्व शिक्षण हे पाटलीपुत्रा पासून जवळ असलेल्या नालंदा विद्यापीठात झाले. […]