इतिहास

इलाहाबादचा अशोकस्तंभ; या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा विविध कालावधीतील लेख

इलाहाबाद ( मागील वर्षी नाव बदलून प्राचीन नाव ‘प्रयागराज’ ठेवले ) येथे ३ ऱ्या शतकातील एक अशोकस्तंभ आहे. या स्तंभाचे वैशिष्ट्य म्हणजे अशोक राजाचे धम्मलिपीत केलेले लिखाण त्यावरती आहे. त्याच्याखाली गुप्त राजवटीतील व समुद्रगुप्त राजवटीत झालेले लिखाण तेथे आढळते. त्यानंतर १५ व्या शतकात जहांगीरच्या काळात अशोक लेखातील काही ओळी नष्ट करून त्यावर केलेले लिखाण आढळते. […]