जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानच्या अभ्यासक्रमात बुद्धिझमचा समावेश

पाकिस्तानच्या राष्ट्रीय अभ्यासक्रमात आता लवकरच बुद्धिझमचा समावेश होणार आहे, ही मोठी आश्चर्याची आणि आशादायक बातमी आली आहे. पाकिस्तानात सर्वत्र एकच राष्ट्रीय अभ्यासक्रम राबविला जाणार असून देशातील सर्वांना समान शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील. दिनांक ४ मार्च २०२२ रोजी बुद्धिझमचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे पाकिस्तानच्या इतिहासात प्रथमच सर्वधर्मसमभावचा गजर चालू होईल, असे आशादायक […]

इतिहास

शाल वृक्ष आणि बुद्धिझम

“बुद्ध आणि त्याचा धम्म” या ग्रंथात असे लिहिले आहे की, सिद्धार्थ यांचा जन्म शाल वृक्षाच्या छायेखाली झाला. त्यांची माता महामाया देवी या माहेरी देवदहनगरीला जाताना वाटेत लुम्बिनी वनात थांबल्या. तेव्हा तेथील एका दाट शाल वृक्षाच्या बुंध्याखाली त्या चालत गेल्या. त्याचवेळी त्यांनी वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेली एक फांदी धरली. आणि त्याच अवस्थेत त्यांनी मुलाला […]

ब्लॉग

चिनी प्रवासी ‘हुएनत्संग’ यांचे अलौकिक योगदान

चिनी भिक्खू हुएनत्संग यांनी भारतामधील १४०० वर्षांपूर्वी केलेल्या प्रवासाचे मला नेहमीच अप्रूप वाटत आलेले आहे. ते भारतात आल्यामुळे त्यावेळची भारतातील बौद्ध धम्माची स्थिती आणि स्थळें यांची अचूक माहिती त्यांच्या प्रवासवर्णनातून मिळते. ते ज्या मार्गाने आले तो मार्ग पुढे सिल्क रोड म्हणून नावाजला गेला. त्यांना मायदेश सोडून जाण्यासाठी चीनच्या सम्राटाने परवानगी दिली नव्हती, म्हणून भारतात काही […]

इतिहास

कर्नाटक किनारपट्टीतील बुद्धिझम आणि नाथ संप्रदाय

आपल्या महाराष्ट्रात कोंकण किनारपट्टीत जशी कुडा लेणी, गंधारपाले लेणी, पन्हाळेकाजी लेणी आहेत तशी कर्नाटकच्या किनारपट्टी भागात लेणी नाहीत परंतु तरीही एकेकाळी बौद्ध धर्म तेथे पसरला होता. अनेक पुरातन बुद्धमूर्ती कादरी ( मंगलोर), हायगुंडा, बाब्रूवाडा आणि मुलर (उडुपी) येथे मिळाल्या आहेत. कर्नाटक किनारपट्टीतील मंगलोर जवळील ‘कादरी श्री मंजुनाथ मंदिर’ हे देवस्थान प्रत्यक्षात एकेकाळचे वज्रयान बौद्ध विहार […]

जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनाम देश आणि तेथील बुद्धिझम

१) बहुतेक करून व्हिएतनामी जनता ही बौद्ध तत्वांचे पालन करते. कम्युनिस्ट राजवटीमध्ये सुद्धा येथे बौद्ध भिक्खुंचे महत्व अबाधित राहिले. व्हिएतनामी बुद्धिझम हा अनेक शाखांचे मिश्रण असलेला बुद्धिझम आहे. त्यातील काही ठळक बाबी या जापनीज झेन, चायनीज चॅन, तिबेटीयन बुद्धिझम आणि अमिताभ (Pure Land) बुद्धिझम प्रमाणे आहेत. त्यामुळे येथील बुद्धिझमवर महायान शाखेचा पगडा दिसतो. फक्त मेकाँग […]

बुद्ध तत्वज्ञान

एही पस्सीको – या पहा आणि मगच विश्वास ठेवा

बुद्धिझम तत्वप्रणाली सर्व जगभर पसरली आहे. तो एक धर्म म्हणून नाही तर दुःखमुक्त जीवन जगण्याचा उच्चतम मार्ग आहे. पाश्चात्य देशात लोकांनी धर्म न बदलता विज्ञानवादी बुद्ध तत्वज्ञान स्वीकारले आहे. राग-द्वेष, मोह-माया पासून मुक्त होऊन निर्वाणपदी पोहोचलेले आणि सर्व मानवजातीला दुःखमुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या बुद्धांनी स्वतःसाठी काही वेगळे स्थान निर्माण केलेले नाही. राजपुत्र असताना पायाशी लोळणाऱ्या सुखांना […]

जगभरातील बुद्ध धम्म

हंगेरीयाची राजधानी ‘बुद्धापेस्ट’ म्हणजेच आताची ‘बुडापेस्ट’

हा मथळा वाचून चकित झालात ना ? पण काय करणार. सत्य हे कधी ना कधी उघडकीस येतेच.या जगात जो जो इतिहास दडला गेला आहे तो तो हळूहळू उघडकीस येत आहे. अयोध्या इथे नुकतेच सापडलेले पुरावे हे जसे बौद्ध संस्कृतीचे दिसत आहेत तसेच हंगेरीया आणि बुद्धीझमचा गेल्या दोन हजार वर्षापासून संबंध असल्याचे तिथल्या आशियाई संस्कृतीवरून आणि […]

इतिहास

बुद्धिझम – बंगालचा सुवर्णमय वारसा

भारतामध्ये बंगाल राज्य पूर्वेकडे आहे तरी त्याला पश्चिम बंगाल असे म्हणतात. कारण ब्रिटिश व्हाईसराय लॉर्ड कर्झन यांनी जुलै १९०५ मध्ये बिहार, झारखंड पासून आसाम, मेघालय पर्यंत पसरलेला बंगाल प्रांत सुलभ राज्य करण्यासाठी पूर्व आणि पश्चिम या दोन प्रांतात विभागला. पूर्वेकडील बंगाल भागात मुस्लिमांचे अधिपत्य आहे तर पश्चिम भागातील बंगाल प्रांतात हिंदू व इतरांचे प्राबल्य आहे. […]

ब्लॉग

व्हिएतनाम मधील बौद्ध धम्म

व्हिएतनाम देशात हनोई शहराजवळील समुद्रकाठी हेलॉंग बे नावाचा परिसर आहे. येथील समुद्रात असंख्य छोटे मोठे डोंगर आहेत. टेकड्या आहेत. आणि त्यातील बहुतेक टेकड्यांवर चढता येणे अशक्य असल्याने ती बेटे चित्रविचित्र वाटतात. तेथील एका डोंगरात निसर्ग निर्मित गुहा तयार झाल्या आहेत. जगभरातील पर्यटक त्या गुहा बघण्यात येतात. त्यामुळे या गुहा बघण्यासाठी तसेच व्हिएतनाम आणि कंबोडिया मधील […]

जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी असल्याचे सरकारकडून जाहीर

श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी २०१८ मध्ये नुयॉर्क येथे भरलेल्या सागर परिषदेमध्ये जाहीर केले की श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी राहील. त्या अगोदर जानेवारी २०१८ मध्ये श्रीलंका सरकारने जाहीर केले होते की श्रीलंकेतील सर्व प्रांताच्या विकासासाठी स्थानिक प्रतिनिधींना खास अधिकार बहाल करण्यात येतील. यामध्ये तामिळ लोकसंख्या असलेला जाफना प्रांत देखील होता. त्या अनुषंगाने घटनेचा नवीन […]