ब्लॉग

बुद्ध धम्मा विषयी आत्मीयता असणारे विवेकानंद जगाला सांगणे गरजेचे

दिनांक 19 मार्च 1894 ला डेट्राइत येथे झालेल्या व्याख्यानमालेत “आशियातील दिपाचा धर्म अर्थात बुद्ध धम्म” या विषयावर विवेकानंद यांनी व्याख्यान दिले, आपल्या व्याख्यानात विवेकानंदानी प्राचीन धर्ममतांचे विस्तृत समालोचन केले. यज्ञवेदीवर होणाऱ्या लाखो पशूंच्या बलिदानाने त्यांनी वर्णन केले. बुद्धांच्या जन्माची आणि जीवनाची हकीकत सांगितली. विश्वाची निर्मिती आणि अस्तित्व यांच्या कारणाविषयी बुद्धांनी स्वतःला कूट प्रश्न विचारले, सृष्टी […]

इतिहास

बुद्ध म्हणजेच अखिल जगताचे महामुनी; बौद्ध देशातील विहारांची आणि पॅगोड्यांची नावे ‘महामुनी’

भारतीय संस्कृतीमध्ये ‘महामुनी’ या शब्दाला खूप महत्त्व आहे, आदर आहे. ‘महा’ म्हणजे सर्वात श्रेष्ठ आणि ‘मुनी’ म्हणजे मौनव्रत धारण करून वनात तप करणारे, ध्यान करणारे तपस्वी. बुद्ध हे सर्वार्थाने भारतीय संस्कृतीत सर्वश्रेष्ठ तपस्वी होते, मुनीवर्य होते. आणि म्हणूनच त्यांना ‘महामुनी’ म्हटले गेले आहे. त्यांच्या मातेचे नाव ‘महामाया’ होते. भारत खंडातील एक श्रेष्ठ तपस्वी, मुनी यांची […]

इतिहास

देवदत्ताने तीनदा बुद्धाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला

देवदत्त हा बुद्धाचा आरंभापासूनच बुद्धाचा द्वेष करीत असे त्याला बुद्धाविषयी तीव्र घृणा वाटत होती. बुद्धाने गृहत्याग केला तेव्हा देवदत्ताने यशोधरेशी लगट करण्याचा प्रयत्न केला. एकदा यशोधरा निद्राधीन होण्याच्या तयारीत असताना तो भिक्खू वेशात तिच्या शयनगृहात प्रवेश करता झाला. तेव्हा त्याला कोणीही अटकाव केला नाही. तिने त्याला विचारणा केली. “भिक्खू , तुला काय हवे आहे? तू […]

इतिहास

भगवान बुद्धांचा सहावा वर्षावास – मंकुल पर्वत, वैशाली-श्रावस्ती, भाग ९

वैशाली वरून बुद्ध श्रावस्ती मधे आले. श्रावस्ती मधील अनाथपिंडकाचे जेतवन आणि विशाखाने दान दिलेले पूर्वाराम विहार या दोन्ही विहारात बुद्ध संघासहित राहत असत. येथून जवळच, वैशाली मार्गावर मंकुल पर्वतावर सहावा वर्षावास व्यतीत केला. आज हा पर्वत किंवा डोंगर म्हणजे कोणता हे निश्चित सांगता येत नाही, मात्र बुद्धांचा आधीच्या आणि नंतरचा वर्षावास हा याच भागात असल्यामुळे, […]

आंबेडकर Live

मी तीन फक्कड गुरू केले; माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली

मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये. प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो. पहिला गुरू बुद्ध मी तीन फक्कड गुरू केले. माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली. माझ्या उन्नतीला जे कारणीभूत झाले. त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरू गौतम बुद्ध. दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते. त्यांनी […]

बुद्ध तत्वज्ञान

ही शेती केली तर मनुष्य सर्व दुःखापासून मुक्त होतो

एके समयी भगवान बुद्ध मगध देशातील ‘एकनाळा’ ग्राम मध्ये विहार करीत होते. तेव्हा एके सकाळी भिक्षेसाठी गावात गेले असता कृषीभारद्वाज ब्राह्मण म्हणाला “हे श्रमणा..! मी नांगरतो, पेरतो आणि माझा निर्वाह करतो. तू ही नांगरुन, पेरून तुझा निर्वाह का करीत नाही ?” तेव्हा भगवान म्हणाले “मी देखील नांगरतो, पेरतो व माझा निर्वाह करतो”. त्यावर कृषीभारद्वाज म्हणाला […]