इतिहास

अद्यापही उत्खनन न झालेला रामग्रामचा मूळ स्तूप

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग द्रोण ब्राह्मणाने केले व त्याचे वाटप त्यावेळच्या आठ गणराज्यांच्या राजांना केले. ती राज्ये खालील प्रमाणे होती. मगधचा राजा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अहकप्पाचे वल्लीय, रामग्रामचे कोलिय, पावाचे मल्ल, कुशिनगरचे मल्ल आणि वेठद्विपाचे ब्राह्मण. नंतर त्या राजांनी त्यावर मोठे स्तूप उभारले. पुढे ३०० वर्षांनी म्हणजेच इ.स. पूर्व २६० […]