इतिहास

गौड बंगाल म्हणजेच बौद्ध बंगाल

सम्राट अशोक यांच्या कारकिर्दी नंतर इ.स. पूर्व २ ऱ्या शतका पासून बंगाल प्रांत हा महायान आणि वज्रयान या बौद्ध पंथाच्या शाखांनी भरभराटीला आला होता. पुढे पाल राजवटीने ८ व्या शतकापासून ते १२ व्या शतकापर्यंत येथे राज्य केले. ते स्वतः बौद्ध होते आणि धम्माचे मोठे पुरस्कर्ते होते. गोपाळ, धर्मपाल, देवपाल या राजांच्या काळात शाक्यप्रभ, दानशील, विशेषमित्र, […]

बातम्या

सन्नती स्थळाची होणार आता उन्नती; लवकरच ‘हा’महाकाय स्तूप उभा राहील

गेल्या वीस वर्षापासून दुर्लक्षित असलेले कर्नाटक राज्यातील जिल्हा कलबुर्गी मधील कनगनहल्ली येथील भीमा नदीच्या तीरी असलेले प्राचीन बौद्धस्थळ सन्नती आता नवीन कात टाकीत आहे. या स्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी ३.५ कोटीचा निधी मंजूर झाला असून स्तूप पुन्हा उभा करण्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. ASI चे विभागीय संचालक जी माहेश्वरी आणि मंडळ अधीक्षक निखिल दास यांच्या […]

बातम्या

महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यात सम्राट अशोक कालीन 2300 वर्ष जुना बौद्ध स्तूप सापडला

बुलढाणा जिल्ह्यात प्राचीन भारतीय संस्कृतीचा तब्बल 2300 वर्ष जुना इतिहास सांगणारा भला मोठा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. यामध्ये सम्राट अशोक कालीन एक बुद्ध स्तूप आढळून आला आहे. त्यामुळे आता बुलडाणा जिल्ह्याचे नाव जागतिक पटलावर उमटले जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील भोन गावात 2002 साली पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाच्या डॉ.भास्कर देवतारे यांच्या नेतृत्वात पुर्णा नदीलगत […]

इतिहास

स्वतःला प्रजेचा सेवक मानणारा राजा – प्रियदर्शी राजा सम्राट अशोक

अशोकाची राजसत्तेविषयीची दृष्टीही अशीच विलोभनीय आणि असामान्य आहे. काळाची चौकट भेदून जाणारी अशी आहे. प्राचीन काळातले जगातले सारेच राजे स्वतःला प्रजेचे मालक समजत. तारणहार मानीत. राजसत्ता हे उपभोगाचं साधन मानलं जाई. राजसत्ता भोगण्यासाठीच असते. असाच जगातल्या साऱ्या राजाचा समज असे. सम्राट अशोक हा एकमेव अपवाद होता. तो स्वतःला प्रजेचा सेवक मानीत असे. राजसत्ता हे सेवेचं […]

इतिहास

अद्यापही उत्खनन न झालेला रामग्रामचा मूळ स्तूप

भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे आठ भाग द्रोण ब्राह्मणाने केले व त्याचे वाटप त्यावेळच्या आठ गणराज्यांच्या राजांना केले. ती राज्ये खालील प्रमाणे होती. मगधचा राजा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, अहकप्पाचे वल्लीय, रामग्रामचे कोलिय, पावाचे मल्ल, कुशिनगरचे मल्ल आणि वेठद्विपाचे ब्राह्मण. नंतर त्या राजांनी त्यावर मोठे स्तूप उभारले. पुढे ३०० वर्षांनी म्हणजेच इ.स. पूर्व २६० […]

लेणी

भारतातल्या पहिल्या कोरीव लेणींची निर्मिती आणि इतिहास

“भारतामध्ये कोरीव लेणींची निर्मिती ही सर्वात प्रथम सम्राट अशोक याच्या काळात झाली.बौद्ध भिक्षूंना हवा असलेला एकांत, ध्यान-धारणा , चिंतन-मनन करण्यासाठी लागणारी शांतता ही नगरात किंवा गावात निवास करुन मिळणारी नव्हती. या साठी त्याने मनुष्यवस्तीपासून दूर अशा डोंगरपरिसरात ही ‘शैलगृहे’ अर्थात ‘लेणी’ खोदविली. अशोक व त्याचा नातू दशरथ ह्यांनी बौद्ध भिक्खूंसाठी दक्षिण बिहारमधील बाराबर, नागार्जुनी, व […]

इतिहास

सम्राटाच्या शिलालेखांच्या शोधाचा प्रवास

सम्राट अशोकांच्या शिलालेखांपासून भारताच्या लिखित इतिहासाचा प्रारंभ होतो हे निर्विवाद सत्य आहे. या शिलालेखांच्या पूर्वीचा लिखित पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही. आपली नीतिपर शिकवण आणि इतिहास हा दगडांवर कायमस्वरूपी कोरून ठेवण्याच्या अशोकांच्या दूरदृष्टीपणाचे आणि बुद्धिमतेचे कौतुक करावेसे वाटते. सम्राटाच्या या शिलालेखांचा शोधप्रवास हा देखील त्याच्या व्यक्तिमत्वा इतकाच रंजक आहे. १७५० साली सर्वात पहिल्यांदा पाद्री टायफेनथालर यांना […]

इतिहास

बुद्धांचे अद्वितीय रिक्त सिंहासन शिल्प; सौंदर्याने नटलेले शिल्प भारतीय शिल्पकलेत प्रथमच आढळले

दक्षिण भारतातील ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या वर्तमानपत्रात कर्नाटकातील सन्नातीच्या स्थळाबाबत मोठा लेख आर.एस.कुलकर्णी यांनी ३० एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता. त्या लेखा सोबत एका शिल्पाचा फोटो प्रसिद्ध झाला आहे. त्या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात भगवान बुद्धांचे रिक्त सिंहासन दाखविले आहे. तरी सुद्धा त्या प्रतिकामय शिल्पामधून त्यांच्या प्रती आदर आणि पूज्यभाव व्यक्त केलेला आढळतो. असे हे […]

इतिहास

सम्राट अशोकाने संपूर्ण जगाला ‘या’ लिपिची सर्वात पहिल्यांदा ओळख करून दिली

मानवजातीच्या इतिहासातील अनेक महान अविष्कारांपैकी “लिपि” विज्ञान हा एक महत्वपूर्ण शोध आहे. साधारणतः पंधरा हजार वर्षांपूर्वी नवपाषाण युगाला प्रारंभ झाला, पाषाणाची औजारे बनू लागली, शेतीकार्याला सुरुवात झाली व गावांची स्थापना होऊ लागली. तोपर्यंत लिपि विकसित झाली नव्हती मात्र काही सांकेतिक अंक किंवा भाव अस्तित्वात आले होते. साधारणतः सहा हजार वर्षांपूर्वी ताम्रयुगाला प्रारंभ झाला. नगरांची स्थापना […]

इतिहास

कर्नाटक आणि सन्नातीचा संपन्न बौद्ध ठेवा

३ एप्रिलला ‘कर्नाटकातील बौद्ध धर्म’ ( Buddhism in Karnataka ) ही पोष्ट मी लिहिली, त्या पोष्टचा परिणाम कुठंपर्यंत झाला हे माहिती नाही. किती ठिकाणी गेली ते ही समजले नाही. परंतु कालच्या दक्षिण भारतातील ‘न्यू इंडियन एक्स्प्रेस’ मध्ये कर्नाटकातील बौद्धधर्म व सन्नती संदर्भात मोठा लेख आर.एस.कुलकर्णी यांनी लिहिलेला आढळला. त्या अनुषंगाने माझ्या पोष्टचे पुन्हा स्मरण झाले. […]