जगभरातील बुद्ध धम्म

१४०० वर्षांच्या या दुर्मिळ झाडाच्या सुवर्ण पानांचा वर्षाव बुद्धमूर्तीवर होतो

चीनच्या शांझी प्रांतातील झोग्नांन पर्वतराजीत निसर्गरम्य परिसरात गौनियन नावाचे बुद्धविहार आहे. याच्या आवारात १४०० वर्षाचा जुना ‘जिंगो’ बिलोबा (Ginkgo Tree) वृक्ष आहे. हिवाळ्यामध्ये या झाडाची हिरवी पाने पिवळीधम्मक सुवर्णा सारखी होतात. आणि मग त्या सुवर्ण पानांचा वर्षाव त्या विहाराच्या आवारातील बुद्धमूर्तीवर दरवर्षी नोव्हेंबरमध्ये होतो. हा वृक्ष त्यांग राजवटीतील राजा लि शिमीन (ई.स. ६२६-४९) काळातला आहे. […]