बातम्या

भदंत सदानंद महाथेरो यांनी केलेले धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील – डॉ.हर्षदीप कांबळे

भारतात धम्माला वाढवण्यात भदंत सदानंद महाथेरो यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या जीवनाचे ध्येयच भारतात बुद्ध धम्म वाढवण्याचे होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर महाराष्ट्र आणि देशभरात बौद्ध धम्माला दिशा देण्याचे कार्य भन्तेजींनी केले आहे. तसेच लहानपानापासून मला त्यांचे सतत मार्गदर्शन मिळत होते. त्यांनी केलेले कुशल कम्म आणि धम्माचे कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत राहील असे म्हणत […]

बातम्या

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्म दीक्षा घेतलेल्या चार भिक्खुंपैकी हे एक होते

वर्धा : आंतरराष्ट्रीय बौद्ध भिक्खू महासंघाचे उपाध्यक्ष तसेच अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महाथेरो यांचे मंगळवारी (ता.४) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर केळझर मधील धम्मराजिक महाविहार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी शासनाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलिसांनी बंदुकीच्या ३ फेरीने त्यांना मानवंदना दिली. भदंत धम्मसेवक […]