इतिहास

हरियाणा नव्हे, महायाना बौद्ध प्रदेश

उत्तर भारतातील हरियाणा राज्य १९६६ साली पंजाब प्रांतातून वेगळे झाल्यावर स्वतंत्र झाले. पण आज हरियाणा आणि पंजाब या दोन्ही राज्याची राजधानी केंद्रशासित प्रदेश असलेले चंदिगड आहे. हेच हिरवेगार हरियाणा एकेकाळी महायान पंथ संस्कृतीचे मोठे केंद्र होते, हे बऱ्याच जणांना ज्ञात नाही. शुंग आणि कुशाण राजवटीची बहरलेली शहरे येथे होती. त्यांच्या तांब्याच्या नाण्यांची टाकसाळ येथे होती. […]