बुद्ध तत्वज्ञान

‘जसे शरीर धूतले जाते तसे मनही धुतले जाते’ हाच बुध्दाने सवश्रेष्ठ शोध लावला

तथागत भगवान गौतम बुध्दाने बुध्दत्वप्राप्तीनंतर जवळ जवळ ४० वर्षांपर्यंत भारतीय समाजाला सत्य धर्माचे, दुःख मुक्तीच्या मार्गाचे मार्गदर्शन केले, बुध्दाने जे जे सांगितले ते त्रिपिटकात (अनेक ग्रंथाचा समुच्चय-टोपलं) सुत्रबध्द केले गेले आहे. ते सर्व तत्वज्ञान विवेचन-मार्गदर्शन प्रचंड स्वरुपात आहे. सागरा समान विशाल आहे.

परंतू एकदा एका आंगतुकास धम्म थोडक्यात जाणून घेण्याची तिव्र इच्छा झाली. त्याने बुध्दाला धम्माचा सार थोडक्यात सांगण्याची विनंती केली.

“सब्ब पापस्स अकरणं कुशलस्स उपसम्यदा सचित्त परिओदपनं एतं बुध्दानं सासनं”

त्यानंतर बुध्दाने त्याची धम्म जानून घेण्याची आतूरता बघून त्याला धम्माचा सार सांगितला तो पाली भाषेत वरिल प्रमाणे. त्याचा मराठी अनुवाद असा की, कोणतेही पापकर्म न करणे, ( वाईट कर्म न करणे ) कुशल कर्म करणे (चांगले कर्मच करणे), चित्त शुध्द ठेवणे, मन शुध्द ठेवणे हीच बुध्दाची शिकवण आहे. या चार ओळी एवढ्या महत्वपूर्ण आहेत की, खरेच त्या धम्माचा सार आहेत.

आपले मन हेच सर्व सुख दु:खाचे उगमस्थान आहे. हे बुध्दाने स्वानुभवातून प्रज्ञेतून दिव्यज्ञानातून जानले. हे मन जेव्हा विकृत होते, मलीन होते, लोभ, व्देष, क्रोध, आसक्ती, घृणा, तिरस्कार, अहंकार, भिती, हिंसकवृत्ती या मनात शिरतात व मन दुषीत होते. यामुळे ज्या प्रकारचे मन दुषीत झाले तशीच वाईट कर्म माणूस करु लागतो. मलीन मन त्याला वाईट कर्म करायला बाध्य करते . कारण शरीर व मनाला तसं करायची सवय पडलेली असते. म्हणून जसे मन, मनावरील संस्कार तशी कायीक-वाचीक कार्ये व्यक्ती करत जातो. मनच विकाराने ग्रस्त असेल तर कृती चांगली कशी घडेल, आचार व उच्चार हे अकुशल होतील, आपण वाईटच कर्म करु लागणार, म्हणून बुध्द म्हणतात.सुखी, दु:खमुक्त व्हायचे तर वाईट कामे करु नका. (शरीराने, मनाने, वाचेने) त्यालाच कायीक वाचीक व मानसीक कर्म म्हणतात.

सुखी व दुःख मुक्त होण्यासाठी व्यक्तीने वाईट कर्म तर करु नयेच. परंतू जिवनात उत्तम मंगलकारी कल्याणकारी, कुशल, चांगले पुण्यदायी कर्म केलेच पहिजे, जिवनात वाईट कर्म न करणे, जेवढे महत्वाचे तेवढेच उत्तम कर्म करणे अगत्याचे आहे. हे जिवन उत्तम मंगल कुशल थांगले कर्म करण्यासाठी आहे. आपल्या कृतीने, मनाने, वाचेने इतरांचे जेवढे भले करता येईल तेवढे करायला हवे. निस्वार्थपणे धम्माच्या कार्यात वाहून घ्यायला हवे. इतरांच्या, आप्तमित्रांच्या, पती-पत्नी, मुले, सगेसोयरे, मित्र, स्त्रीया, बालके, भिक्खु यांची सेवा करने हे कुशल कर्म होय. सर्वात मोठे कुशल कर्म म्हणजे ( गृह स्वार्थासाठी आपल्यावर आश्रीतांचे चांगल्या मार्गाने उदरभरण करणे, त्यांचे दु:खात, आजारपणात सेवा करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हेच कुशल कर्म होय.

याहीपेक्षा आणखी सर्वोत्तम कुशल पूण्यदायी कर्म म्हणजे बुध्दधम्माच्या प्रसार-प्रचारार्थ तन मन धन वेळ देणे हे होय. बुध्द धम्माचा प्रसार म्हणजे सत्याचा प्रसार, दु:खग्रस्त मानवांचे अश्रू पूसने म्हणजे बुध्द धम्माचा प्रसार करणे होय. हे सर्वश्रेष्ठ धम्मदान होय. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धम्म प्रसार-प्रचारात भाग घेणे हे कुशल कर्म होय.

शेवटी बुध्द चित्त शुध्द ठेवण्याचे सांगतात कारण सुख व दुःखातून मुक्ती खऱ्या अर्थाने हवी असेल तर आपले मन शुध्द, निर्मल, विकाररहीत असणे आवश्यक आहे. मनाची निर्मलता, शुध्दता हाच तर बुध्द धम्माचा पाया आहे. ती प्रथम गरज आहे. हे मन अत्यंत चंचल आहे. सवयीप्रमाणे ते सतत शरीराला धावायला सांगते व शरीन मनाचे गुलाम बनल्याने ते मन सांगेल तसे निमुटपणे ऐकत जाते. मनात चोरी करावी हा विचार येताच शरीर ते करायला धावेल. मनात क्रोध जागला की आपण उठून एखाद्याला मारु म्हणजेच शरीरावर चंचल मनाने पूर्ण नियंत्रण केले असते. म्हणून मन म्हणेल तसं आपण जिवणभर करत राहतो व दुखात अधीकाधीक रुतत जातो.

म्हणून बुध्द सांगतात मन मलीन होऊ देऊ नका, मन सदैव निर्मल ठेवा. म्हणजेच मनात क्रोध, आसक्ती, लोभ, देश, घृणा, तिरस्कार, गर्व-इर्षा हिंसावृत्ती, चोरी करण्याची इच्छा आदी विकार निर्माणच होऊ देऊ नका. मनावर हे वाईट संस्कार पडूच देऊ नका. सान्या अकुशल वाईट संस्कारापासून हे मन दुर ठेवा म्हणजेच ते आपोआप निर्मळ राहील. हे मन खरेच विकारापासून कायमचे दूर ठेवता येते. तसेच या मनावर पुर्वी झालेले वाईट संस्कार कायमचे धुवून-पुसून टाकता येतात. हे अनेकांना चमत्कारीक वाटेल, वा खोटे वाटेल. पण बंधू – भगिनींनो, बालयूवा मित्रांनो, हिच बुध्द धम्माची मानवतेला सर्वश्रेष्ठ देन आहे.

मन निर्मळ शुध्द कसे ठेवायचे, त्याचावरील कोणत्याही विकारांचा प्रभाव कसा टाळायचा, मन कसे विकारांपासून दूर ठेवायचे, हेच तर बुध्द सांगत फिरले तब्बल ४० वर्षे ! यालाच बुध्दाचा दु:ख मुक्तीचा मार्ग म्हणतात. जसे शरीर धूतले जाते तसे मनही धुतले जाते व शुध्द निर्मल केले जाऊ शकते. हाच बुध्दाने सवश्रेष्ठ शोध लावला . त्यालाच विप्पसना म्हणतात. विपस्सनेतून मन विकारापासून दूर ठेवता तर येतेच. शिवाय जुने विकार काढून टाकले जातात. हे प्रत्यक्ष विप्पस्सना केल्याशिवाय कळणार नाही. परंतु हे १०० % सत्य आहे. यादु:ख मुक्तीच्या महान उपायाचा आपण अवश्य लाभ घ्यावा. लाखो लोक ( जगभर ) तो लाभ घेत आहेत. बौध्दच नव्हेतर सर्वच धर्मातील लोक मन शुध्द करण्याच्या या मुक्ती मागनि जाऊन सुखी व दुःख मुक्त होत आहेत. यावरुन, १ ) कोणतेही वाईट कर्म न करणे २ ) चांगले कर्म करणे. ३ ) मनाला, चित्ताला सदैव शुध्द, निर्मल ठेवणे हीच बुध्दाची दु:ख मुक्तीची शिकवण आहे.

One Reply to “‘जसे शरीर धूतले जाते तसे मनही धुतले जाते’ हाच बुध्दाने सवश्रेष्ठ शोध लावला

Comments are closed.