जगभरातील बुद्ध धम्म

२००० वर्ष जुनी बुद्धमूर्ती पाकिस्तानाने स्विझरलँडला प्रदर्शनासाठी दिली

सन १९०९ मध्ये पाकिस्तानातील ‘तक्त-ही-बाही’ या प्रसिद्ध बौद्ध स्थळापासून जवळ असलेल्या ‘साहरी बेहलोल’ गावाजवळील उत्खननात ३.५० मीटर उंचीची पाषाणाची भव्य बुद्धमूर्ती मिळाली. उत्कृष्ट गंधार शिल्पकलेचा नमुना पाहून सारेच अचंबित झाले. या मूर्तीचे वजन जवळजवळ २.०० टन आहे. तेव्हापासून पेशावर म्युझियम मध्ये ही भव्य बुद्धमूर्ती मुख्य आकर्षण ठरली होती.

स्विस म्युझियम मध्ये १२ डिसेंबर २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत मोठे बुद्ध प्रदर्शन भरले होते. (Next Stop Nirvana– Approaches to Buddhism) यास्तव स्विझरलँड सरकारने पाकिस्तानला सदर बुद्धमूर्ती काही कालावधीसाठी प्रदर्शनासाठी मागितली. त्यानुसार करारनामा करण्यात येवून ही गंधार कलाकृती स्विस येथे रिटबर्ग म्युझियम मध्ये नुकतीच काळजीपूर्वक हलविण्यात आली.

भगवान बुध्द यांच्याबद्दल जगभर कुतूहल आणि श्रद्धा वाढत आहे. स्विझरलँड देशाला सुद्धा बौद्ध कलाकृतीचे प्रदर्शन भरवावेसे वाटले, यातच सर्व काही आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *