ब्लॉग

बौद्ध धम्माची प्राचीन स्थळे हाच भारताचा खरा वारसा

श्रीलंकेतील अभयागिरी हा एक पुरातन स्तुप आहे. ३ वर्षापूर्वी त्याचे नूतनीकरण करण्यात आले. ३१ जुलै २०१५ रोजी श्रीलंकेचे अध्यक्ष सिरीसेना यांनी बुद्ध वंदना म्हणून या नूतनीकरण केलेल्या अभयागिरी स्तुपाचे उदघाटन केले. या उदघाटनाला १००० च्यावर पाहुणे, २५० भिक्खू आणि ५० भिक्खुणी यांना आमंत्रित करण्यात आले होते.

अभयगिरी स्तुपाचे पूर्वीचे छायाचित्र

जर श्रीलंका देश त्यांच्या जुन्या स्तूपांचे नूतनीकरण करून धम्म स्थळांची जपणूक करतो तर मग भारतात अनेक बौद्ध धम्माशी निगडित पुरातन अवशेष आहेत, त्यांचे नूतनीकरण आपल्या देशात का होत नाही? उदा. नालासोपाऱ्याचा स्तुप. याचे नुतनीकरण केले तर पुढच्या अनेक पिढ्यांना तो मार्गदर्शक ठरेल. ऊन-वारा-पाऊस यामुळे पुरातन स्थळांची झीज होत असते. तरी त्यांच्या दुरुस्तीकरिता आवश्यक असेल तेथे संबंधीत खात्याच्या नियमात बदल केले पाहिजेत. झालेली अतिक्रमणे काढून टाकली पाहिजेत. व बौद्ध धम्माशी निगडित असलेल्या सर्व पुरातन वास्तू यांची चांगल्या तर्हेने देखभाल-दुरुस्ती झाली पाहिजे.

बौद्ध धम्माची प्राचीन स्थळे हाच भारताचा खरा वारसा आहे. आणि ज्या दिवशी सर्व भारतीयांना याचे आकलन होईल, त्या दिवशी भारत जगातील नंबर एकचा देश असेल.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

2 Replies to “बौद्ध धम्माची प्राचीन स्थळे हाच भारताचा खरा वारसा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *