जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी असल्याचे सरकारकडून जाहीर

श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानील विक्रमसिंघे यांनी २०१८ मध्ये नुयॉर्क येथे भरलेल्या सागर परिषदेमध्ये जाहीर केले की श्रीलंकेच्या घटनेमध्ये बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी राहील.

त्या अगोदर जानेवारी २०१८ मध्ये श्रीलंका सरकारने जाहीर केले होते की श्रीलंकेतील सर्व प्रांताच्या विकासासाठी स्थानिक प्रतिनिधींना खास अधिकार बहाल करण्यात येतील. यामध्ये तामिळ लोकसंख्या असलेला जाफना प्रांत देखील होता. त्या अनुषंगाने घटनेचा नवीन मसुदा देखील तयार करण्यात आला होता. पण नंतर अशी बातमी पसरली की नवीन घटनेत बुद्धिझमचा प्रभाव कमी करण्यात आला आहे. या बातमीमुळे बौद्ध जनता खवळली गेली.

श्रीलंकेची लोकसंख्या २१ मिलियन म्हणजेच २.१० कोटी आहे. यामध्ये ७०% टक्के जनता बौद्ध आहे. व ते अध्याप तामिळी बरोबर २६ वर्षे चाललेले युद्ध विसरलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले की घटना बदलण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर सर्व बौद्ध जनता उठाव करेल.

स्वातंत्र्य मिळाल्या पासून श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती व पंतप्रधान पदावर नेहमीच बौद्ध व्यक्तींची निवड झालेली आहे. बौद्ध धर्म हा या देशाचा अविभाज्य मुख्य घटक आहे. तशात ७५ प्रमुख भिक्खुंनी सुद्धा सरकारला तंबी दिली आहे की घटनेला हात लावाल तर खबरदार. त्यांनी पुढे सांगितले आहे की या देशात नेहमीच बुद्धिझमला प्राधान्य देण्यात आले आहे व पुढेही मिळालेच पाहिजे.

माजी राष्ट्रपती महेंद्र राजपक्षे व इतर बौद्ध संघटनांनी सुद्धा सरकारला धारेवर धरले आहे. यास्तव घाबरून श्रीलंका सरकारने जाहीर केले की या देशात बुद्धिझम नेहमीच अग्रस्थानी राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *