छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर अवघा दख्खन घशात घालण्यासाठी सात लाखांची खडी फौज, तोफखाना व प्रचंड दारुगोळा आणि पाच कोटींचा खजिना घेऊन महाराष्ट्रात उतरलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य ‘ दिल्लीश्वरा’च्या, ६०, ००० फौजेचे नेतृत्व करत असलेल्या ‘ शहाबुद्दीन फिरोजजंग ‘ नावाच्या कसलेल्या सरदारालाही तब्बल सहा वर्षे रामशेज किल्याला वेढा घालूनही हा किल्ला जिंकता आला नाही.
नाशिकच्या उत्तरेला सात मैलांवर असलेला, चार दिशांपैकी कुठल्याही दिशेने अगदी सहज व अतिशय कमी साधनसामग्री व सैन्यांनिशी रामशेज किल्ला कब्जात आणणे सहज शक्य असूनही हा किल्ला तब्बल सहा वर्षे अजिंक्य राहिला तो तिथल्या किल्लेदाराच्या अतुलनीय रणनिती व त्याच्या एकनिष्ठ असलेल्या ६०० सैनिकांमुळेच.

इतिहासकारांनी जरी जाणूनबुजून, षडयंत्रपूर्वक येथील शूर किल्लेदाराचे नाव ‘अज्ञात किल्लेदार’ म्हणून प्रसृत केले असले, तरी या किल्याचा तो शूरवीर व निधड्या छातीचा मर्द किल्लेदार हा एक ‘महार’ होता, आणि त्या वीराचे नांव होते ‘ गोविंद गोपाळ महार (गायकवाड), ज्याने नंतर औरंगजेबाने हालहाल करून ठार मारलेल्या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज याच्या मृतदेहावर मोठ्या हिंमतीने अग्निसंस्कार केले होते.

इतिहासकारांनी अज्ञात ठेवलेल्या या किल्याचा किल्लेदार प्रकाशझोतात आणण्याची मोलाची कामगिरी ‘ शिवकालीन महार योध्दे : गोविंद गोपाळ महार व रायाप्पा महार ‘ या संशोधनपर पुस्तकाचे लेखक सिधप्पा मोरे यांनी केली आहे. १९६७ साली प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांनी अतिशय महत्वपूर्ण असलेल्या व सध्या दुर्मिळ ठरलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.
काल मी या किल्ल्यास, या किल्ल्याचे किल्लेदार वीर गोविंद गोपाळ महार (गायकवाड) यांचे तेरावे वंशज मा. राजेंद्र गायकवाड व १ जानेवारी १८१८ चे कोरेगाव भीमा चे युद्ध इंग्रजांना केवळ ५०० मर्द महार सैनिकांनिशी जिंकून देऊन, जुलमी पेशवाईचा अस्त घडवून आणणारे शूरवीर शिदनाक महार (वाघमारे) कळंबीकर यांचे आठवे वंशज मा. सुभाष इनामदार यांच्या सोबत त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत भेट देऊन, वीर गोविंद गोपाळ यांच्या खऱ्या इतिहासाला उजाळा दिला, आणि त्यांच्या शौर्यास मानाचा मुजरा करून, त्यांच्या स्मृतींस अभिवादन केले.
– अशोक नगरे
मला आवश्यक माहिती मिलत आहे। आभार
The History of Mahar Community should be assembled beyond the caste , History and the
Historiographers should analysis the events related to Mahar Community, with the following Objectivity text.
Nice
ईतिहासीक बुक को पडना है यह बुक कहॉ मिल सकति है