बांगलादेशात चित्तगाव परिसरात ४५ फूट उंचीची एक बुद्ध मूर्ती तयार करण्यात आली असून ते एक सामाजिक एकात्मतेचे मोठे प्रतीक झालेले आहे. कारण या मूर्तीचे बांधकाम करण्यासाठी फक्त बौद्धच नाही तर ख्रिश्चन, हिंदू आणि मुस्लिम कम्युनिटी यांनीसुद्धा दानाच्या स्वरूपात योगदान दिलेले आहे. या बुद्धमूर्ती साठी ३.५ मिलियन टाका ( $ ४२,०००/-) इतका खर्च झालेला आहे.
चित्तगाव युनिव्हर्सिटीचे पालीचे प्रोफेसर जिनाबोधी भिक्खू यांनी सांगितले की ध्यानस्थ बुद्ध मूर्तीला बौद्ध संस्कृती मध्ये फार महत्त्व आहे. त्यामुळे बांगलादेश मधील व इतर देशातील पर्यटक तेथे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेथील वृत्तपत्र ‘प्रोथमआलो’ यांनी सुद्धा म्हटले आहे की हे एक सामाजिक सलोख्याचे मोठे उदाहरण आहे.