जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानमधील पहिल्या शतकातील टोकदारा स्तुप

पहिल्या शतकात बांधलेला टोकदारा स्तूप ढासळण्याच्या मार्गावर असून सरकारने व पुरातत्व खात्याने त्याची वेळीच डागडुजी करावी असे पाकिस्तानमधील ‘द डॉन’ या वृत्तपत्राने म्हटले आहे.

बरीकोट शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य परिसरात टोकदारा स्तुप आहे. जेव्हा धम्म पहिल्या शतकात बहरला होता तेव्हा हा स्तुप उभारण्यात आलेला आहे. परंतु चोर, दरोडेखोर, पुरातन वस्तू लुटारू यांनी मौल्यवान वस्तूसाठी हा सुंदर स्तूप खणून विद्रूप केला आहे. येथे मोठे विहार, सभामंडप, लेणी- गुहा व निवासस्थाने आहेत. १९२६ मध्ये हंगेरियन ब्रिटिश पुरातत्ववेत्ता ओरल स्टेन याने हा स्तुप शोधला असा दाखला मिळतो. येथे पाण्याची ४-५ मोठी कुंड सदोदित भरलेली असतात.

या महत्त्वाच्या स्तूपाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्तूपाची संरचना व सभोवतालचा परिसर यांचे सुंदर मिश्रण येथे झालेले आढळते असे रोम विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. मारियो टरको यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत येथील जागेचा वाद पाकिस्तान कोर्टात चालू असून त्याबाबतचा निर्णय झाल्यावर स्तुपाचे नुतनीकरण करण्यात येईल असे कळते.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *