बुद्ध तत्वज्ञान

मानवी जीवनाला नियंत्रीत व प्रभावित करणारे पाच नियम

माणवी प्राण्याचे जीवन, त्याचे शारीरिक व मानसिक, अस्तित्व, शरीर व मनाची जडघडन, स्वरुप, आकार या सर्वच घटकांना नियंत्रीत करणारे संचालीत करणारे पाच नियम बुध्दाने सांगितले आहेत. म्हणजेच मानवाच्या शरीराला व मनाला प्रभावीत करणारे व निर्धारीत करणारे पाच प्रकारचे नियम आहेत. त्या पाच नियमाव्दारे आपली जडणघडण व त्यानुसार जीवनातील यश अपयश ठरत असते. सुख-दुःखाचे स्वरुप ठरत असते. हे शरीर व मनाला म्हणजे मानवी जीवनाला नियंत्रीत करणारे प्रभावित करणारे पाच नियम खालीलप्रमाणे आहेत.

(१) कर्म नियम : – ( Kamma Niyama ) यालाच कर्म व फळाचा नियम म्हणतात. यालाच कृति तसा परिणाम असेही म्हणतात. यालाच कार्यकारण भावाचा सिध्दांत, नियम असेही म्हणतात. जसी कृती तसे फळ असे या नियमाचे स्वरुप आहे. माणसाचे मन, शरीर त्याचे जीवन मोठ्या प्रमाणावर या कर्म व फळ या व्दारा संचलीत होते. ही कर्म म्हणजे शारिरीक नसून मानसिक आहेत. ज्याप्रकारची मने घेऊन, मनोवृत्ती घेऊन आपण जगू व कृती करु तसाच कृतीचा परीणाम त्याला भोगावा लागतो. आपला जन्म हा आपल्या माणसिक कृती, मनोवृत्ती, मनोविकार, मनशुध्दता याव्दारा नियमित होतो. आपले मन व मनावरील संस्कार हेच आपले सुखदःख नियंत्रीत करते. शुध्द मन घेऊन माणूस मृत्यू पावला तर ते चित्त पुन्हा शुध्द मन घेऊनच जन्माला येते. अर्थात हा तोच माणूस नसतो किंवा त्या रामा किंवा गोमाचा पुन्हा जन्म नसतो. ही नावे आपण दिली आहेत. निसर्गाला कोण रामा कोण गोमा हे काय माहीत? याचा अर्थ आपले जीवन कर्म व फळे या नियमाने चालते. चांगले कर्म शुध्द मनाने केलेली कर्म हे चांगलाच परिणाम देणार ! मृत्यू समयी आपले मन जसे असेल (शुध्द/मलीन) तसाच पुढचा जन्म असतो. म्हणूनच युध्द मनाच्या शुध्दतेला सर्वात जास्त महत्व देतो. याचा अर्थ जिवनातील दर्जा सुख अपयश यश, प्रगती हे सारं मोठ्याप्रमाणावर मनाच्या शुध्दतेवर अवलंबून असते. सुख दु:खाचे हे एक महत्वाचे कारण आहे. म्हणूनच एकाच मायबापाच्या पोटी भिन्न स्वभावाची लेकरं जन्मास येतात. बिज सारखे असतांना स्वभाव, रुपरंग बुध्दीमत्ता वेगळी का असते? याचे कारण पुर्व जन्मातील आपल्या मनाची शुध्दता वा अशुध्दता व अशा मनाने केलेले चांगले वाईट कर्म होय.

(२) ऋतू नियम : – ( Utu Niyama ) ऋतू नियम म्हणजेच निसर्ग नियम होय. उदा. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, पाऊस, उन, वारा यांना नियंत्रीत करणारे निसर्ग नियम होय. याही निसर्ग नियमांचा परिणाम मानवाच्या शरीर व मनावर होतो. त्यांच्या एकूण प्रकृतीवर होतो. व तसाच तो त्याचा सुख-दु:खावरही होतो. निसर्गाच्या नियमांच्या प्रभावानेही आपले जिवन प्रभावित होते. उदा. थंड हवेच्या ठिकाणच्या लोकांची मानसिकता वेगळी असते. काही प्रमाणात वातावरणाचा परिणाम व्यक्तीच्या शारिरीक व मानसिक जडण घडणीवर होतो.

(३) बिज नियम : – ( Bija Niyama ) या नियमांना भौतिक नियम असेही म्हणता येईल. ( Physical Law ) किंवा या नियमांना ( Inorganic ) किंवा ( Physical organic ) असेही म्हणता येईल.
उदा. गहू पेरले तर ज्वारी उगवणार नाही किंवा ज्वारी पेरली तर गहू उगवणार नाही. उसाची चव गोडच राहील ती कडू राहणार नाही. याचा अर्थ प्रत्येक दृष्य पदार्थाचे जे गुणधर्म आहेत तसेच त्यांचे परिणाम असतात. उदा. जुळी मुले दिसायला शरीराने समान असतात याचे कारण त्याला जन्मदेणारे विर्यबिज हे एकाच प्रकारचे असते हे होय. बिजनियमावरुन व्यक्ती / फळे / पशुंचा बाह्य आकार रुपरंग ठरतो. रोगट कुजके बियाने पेरल्यास पिक कमजोर येते. यालाच बिज तसे फळ असेही म्हणता येईल. पण हे बिज दृष्य रुपातील होय. भौतीक स्वरुपातील होय. आंबा लावला कि आंब्याचे झाडच येईल. जसा लावला त्याच प्रकारचे आंबे लागतील. यालाच बिज नियम म्हणतात.

(४) चित्त नियम : – (Citta Niyama) (Order of Mind) यालाच चित्तवृत्तीचे नियम म्हणतात, किंवा मन शक्तीचे नियम म्हणतात. मानवाच्या मनाशी मनाच्या अवस्थांशी संबंधीत जे काही नियम आहेत, त्यांना चित्तनियम म्हणतात. उदा. व्यक्ती जसे चित्त घेऊन मृत्यू पावला तसेश चित्त घेऊन नवा मानव जन्म घेतो. ( रामा मेला तर रामच जन्मत नाही ) चित्ताच्या अवस्थांनूसार मानवी जन्म प्राप्त होतो. चित्ताच्या शुध्दतेचा व मानवी सुख दु:खाचा जो परस्पर संबंध आहे. त्यालाच चित्तनियम म्हणतात. मानवी मनाच्या संदर्भातील नियम म्हणजे चित्तनियम होय.

(५) धम्म नियम : – ( Dhamma Niyam ) या नियमात विश्वातील सर्व नैसर्गीक घटकांना नियंत्रीत करणाच्या नियमांचा समावेश होतो. निसर्गाचे जे नियम आहेत त्यांना धम्मनियम म्हणतात. उदा. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, गृह गोलाची परस्पर गुरुत्वाकर्षण शक्ती, त्यांची गती वगैरेला धम्म नियम म्हणतात. बुध्दाच्या बोधी सत्वाच्या जन्माबाबतच्या नियमांनाही धम्म नियम म्हणतात. विश्वातील नैसर्गीक घडामोडीं मागील जे नियम आहेत त्यांना धम्म नियम म्हणतात.

One Reply to “मानवी जीवनाला नियंत्रीत व प्रभावित करणारे पाच नियम

Comments are closed.