इतिहास

भारतातील या तीन सम्राटांनी बुद्ध धम्मासाठी केलेले महान कार्य

सम्राट अशोक

सम्राटाने स्वतःच्या राज्यात ८४००० स्तूप उभारले. बौद्धधम्मीय पंचशीले राजाज्ञा रूपाने देशोदेशी शिलाखंडावर कोरले. धर्मसगीराचे आयोजन केले. स्वपुत्रास व स्वकन्येस श्रीलंकेस धम्मप्रचारास पाठविले. महामोगगलितिस्सयांच्याकडून संघात छदममवेषाने घुसलेल्या इतर धम्मीय श्रमणांची संघातून हकालपट्टी केली कारण ते इतर धर्मीयांच्या मते भगवंताच्या नावाने खपवीत असत. परदेशांत बौद्धधम्माच्या प्रचारार्थ भिक्खुना पाठविले. संपूर्ण भारतभर काश्मीर से कन्याकुमारीपर्यंत धम्माचा प्रचार करून धम्मराज्य स्थापित केले.

सम्राट कनिष्क

सम्राट कनिष्काने धम्माची सेवा तन, मन आणि धनाने केली. तो साहित्य आणि कलेचा आश्रयदाता होता आणि महाविजेता होता. त्याच्या दोन राजधान्या होत्या.

कपिशा ( काबूलच्या उत्तरेस ) आणि

पूर्षपूर् ( पेशावर )

सम्राट कनिष्काचे कार्य

  • बौद्ध भिक्खू सहाय्य
  • बौद्धांसाठी विहार बांधून दिले.
  • भ.बुद्धांच्या मूर्तीचा प्रथम निर्माता, तो महायानाचा प्रथम संरक्षक होता. पाली भाषेऐवजी संस्कृत भाषेत बौद्ध साहित्य निर्माण करावयास चालना दिली.
  • चीन, जापान, कोरिया, तिबेट देशांत प्रसारक पाठविले.
  • बुद्धवचनांना क्रमबद्ध करविले. ताम्रलेख लिहिविला.
  • त्याने राजदरबारांत महाकवी अश्वधोष, वसुमित्र आणि मातृचेर यांचा सन्मान केला.
  • वैद्यकी शास्त्रास प्रोत्साहन देण्यास चरक वैद्यांना सन्मान केला.

सम्राट हर्षवर्धन

सम्राट हर्षवर्धन राजा कला व विद्येचा पारखी होता, त्याच्या दरबारी बाणभट्ट महाकवी होता. ज्याने हर्षचरित काव्य लिहिले. स.हर्षवर्धनाने बौद्ध संघाची नव्याने स्थापना केली. विहार, विश्रामगृह आणि स्तूप बांधले. बौद्धधम्माच्या प्रचारार्थ कार्य केले ते असे

  • पशुवध बंद केला. मांस खाणे अप्रध घोषित केले
  • दरवर्षी बौद्ध भिक्खूची महान परिषद बोलावीत असे व वाईट भिक्खूची हकालपट्टी करण्यात येत असे.
  • विहार, स्तुप, विश्रामगृह बांधले आणि जुन्या विहाराची डागडुजी केली.