जगभरातील बुद्ध धम्म

श्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा…

श्रीलंकेतील नुवारा एलीया जिल्हात कडाडोरा येथे एका जलाशयात बुद्ध विहाराचे अवशेष आहेत. १९७९ साली कोतमाले धरणाचे बांधकाम केल्यामुळे हे बौद्ध विहार पाण्याखाली गेले होते. हे विहार फक्त दुष्काळी हंगामासारख्या दुर्मिळ प्रसंगी जलाशयातील पाण्याची पातळी कमी असताना कडाडोरा विहार दिसून येते. यामुळे कडाडोरा विहाराला “हिडिंग टेम्पल” म्हणून संबोधले जाते. हे पाण्याखाली गेलेले विहार प्रथम 2009 मध्ये दिसले होते आणि अखेर २०१६ मध्ये दिसले होते.

कोतमाले धरणाचे बांधकाम १९७९ मध्ये महावेली विकास कार्यक्रमांतर्गत सुरू झाले. १९८५ मध्ये या जलाशयाचे काम पूर्ण झाल्यावर कोतमालेतील सुमारे ५७ गाव व ५४ धार्मिक स्थळे पाण्याखाली गेली असल्याचे सांगितले जाते. कडदोरा विहारा वगळता हेपाणे विहार, मोरपे देवालय, ओथलावा विहार, पट्टिनी देवालय आणि मेडागोडा विहारासह इतर विहार आणि मंदिरे जलाशय बांधल्यानंतर पाण्याखाली गेली आहेत. यापैकी बरेच बौद्ध विहार आणि मंदिर आता अस्तित्वात नाहीत.

जलाशयात बुडलेल्या या विहाराच्या स्मरणार्थ जलाशयाच्या अधिकाऱ्यांनी १९८० साली कोटमले महावेली महासेया हे विहार बांधून दिले आहे. कोतमाले हे ऐतिहासिक ठिकाण आहे. मध्य डोंगराळ प्रदेशात मलायता रता प्राचीन कोटमाले म्हणून ओळखले जात असे.

One Reply to “श्रीलंकेतील हे ऐतिहासिक बुद्ध विहार प्रथम २००९ मध्ये दिसले आणि पुन्हा…

  1. BOUDDHRASHTRA JE–JE AHET TYANA NAYNAT KARNYACHA ”MANUWADI” YANI KELA TARI HI BOUDDH RASHTRACHI ODAKH ,ITIHAS VISARNAR NAHIT..YA BHU-TALAWAR JOPARYANT MANAW JIWANT AHET ,TOPARYANT ”BOUDDHRASHTRA KAYAM RAHIL..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *