ब्लॉग

१९६४ साली प्रदर्शित ‘शहनाई’ चित्रपटात बौद्ध भिक्खूचा ‘हा’ प्रसंग चितारला होता

न तं माता पिता कथिरा, अज्जे वापि च आतका ।
सम्मपाणिहितं चित्तं सेय्यसोनं ततो करो ।।

अर्थात – जेवढे हित आईवडील किंवा इतर संबंधित व्यक्ती करू शकत नाही तेवढे हित सम्यक मार्गाला लागलेले मन करीत असते . (धम्मपद)

मथुरा नगरीत वासवदत्ता नावाची एक सौंदर्यवती नृत्यांगणा होती. त्याच नगरात उपगुप्त नावाचा एक तरुण राहतो. वासवदत्ताचे त्या तरुणावर प्रेम असते. पुढे तो भिक्खू संघाची दीक्षा घेतो. पौर्णिमेच्या एका रात्री वासवदत्ता साजश्रृंगार करून भिक्खूच्या उपवनात जाते. तेव्हा तो ध्यानसाधनेत रममाण असतो.

त्याची साधना भंग करण्यासाठी वासवदत्ता बेभान होऊन नृत्य सादर करते. शेवटी ती थकून भिक्खूचरणी लीन होते… ‘आम्ही फक्त शरीराचे सौंदर्य बघतो जे अनित्य अन् क्षणिक आहे. सुंदर तर मन आहे. मनात दुसऱ्याप्रती प्रेमभाव असतो’ याचा तिला साक्षात्कार होतो.

१९६४ साली प्रदर्शित झालेल्या निर्देशक एस.डी. नारंग यांच्या ‘शहनाई‘ चित्रपटात हा प्रसंग चितारला आहे. अभिनेत्री राजश्री आणि विश्वजित यांच्या अप्रतिम अभिनयाने हा चित्रपट त्याकाळी तुफान गाजला होता.

https://www.youtube.com/watch?v=vdQRNPcP3Js&t=3708s 

वरील लिंक ओपन करून व्हिडिओ मध्ये ५३ मिनिट ३० सेकंदापासून ५९ मिनिट ०५ सेकंदापर्यंत हा प्रसंग पाहू शकता.

-मिलिंद मानकर, नागपूर