जपानच्या उत्तर भागात काही बेटे आहेत. तेथील एका बेटावर ‘सोपोरे’ नावाचे एक मोठे शहर आहे. या सोपोरे शहरामध्ये १९७२ साली हिवाळी ऑलिम्पिक भरविण्यात आले होते. तसेच इथे वर्षातून एकदा सप्टेंबरमध्ये स्नो फेस्टिवल भरला जातो आणि त्यावेळी दोन मिलियन प्रवासी येथे भेट देतात.

या शहराबाबत एक गमतीदार गोष्ट जपानी भिक्खूनी सांगितली कि या शहराचे ‘सोपोरे’ हे नाव महाराष्ट्रातील ‘नालासोपारा’ या शहरावरून पडले आहे. मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावरील नालासोपारा हे एकेकाळी मोठे बंदर होते. प्राचीनकाळी दूर देशांतून अनेक व्यापारी नौका येथे येत असत. इथला स्तुप प्रसिद्ध असून बौद्ध साहित्यात नालासोपाऱ्याचा अनेकदा उल्लेख आला आहे. त्यामुळे कदाचित जपानमधील या शहराला ‘सोपोरे’ नाव पडले असावे.
-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)
Best