जगभरातील बुद्ध धम्म

UAE मधील एकमेव बौद्ध विहार

सिरिलंकेतील एका बौद्ध संस्थेने ‘युनायटेड अरब एमिरत’ देशात एक बौद्ध विहार बांधले असून ते तेथील बौद्ध जनतेमध्ये लोकप्रिय झाले आहे. वास्तविक UAE मध्ये ७७% मुस्लिम, ६.६०% हिंदू आणि केवळ २% बौद्ध आहेत व उरलेले इतर धर्माचे आहेत. काम करण्यासाठी आलेला बौद्ध कामगार हा बहुतांशी चीन, नेपाळ, थायलंड, सिरिलंका आणि व्हिएतनाम मधील आहे. तसेच मोठया पदावर म्हणजे कंपनी संचालक, व्यवस्थापक, अभियंता पदावर जो सुखवस्तू बौद्ध वर्ग आहे तो चीन, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवान देशातील आहे.

मात्र या महामेनावा विहारात सर्व एकत्र येवून बुद्ध प्रार्थना म्हणतात. एकत्र साधना करतात. येथे बोधिवृक्षाची फांदी रुजविण्यात आली असून येणारा महिलावर्ग त्यास पाणी देतो. तसेच विहाराच्या अन्य कार्यक्रमास त्यांची खूप मदत होते. शुक्रवारी सुट्टी असल्याने येथे खूप गर्दी असते. इथे आल्यावर कामाचा ताण नाहीसा होतो आणि मन प्रसन्न होते, असे अनेकांनी सांगितले. कुटुंबापासून, देशापासून दूर राहिल्याने अनेकांना हे महामेनावा बौद्ध विहार आपलेसे वाटते. यामुळे ओळख होऊन एकमेकांना मदत होते.

‘महामेनावा’ या विहाराची लोकप्रियता पाहून सिरिलंकन बौद्ध संस्था एका वेळेस १०,००० लोक बसू शकतील असे जगातील सर्वात मोठे विहार दुबईच्या आसपास बांधण्यासाठी अरब देशांशी चर्चा करीत आहे. तरी कधी दुबईला गेलात तर जुमैराह मधील या बौद्धविहाराला भेट द्या. सर्व देशांतील बौद्ध बांधवांची येथे ओळख होईल.

One Reply to “UAE मधील एकमेव बौद्ध विहार

  1. Shrilankans peoplels are thinking about bild up New big Buddhist temple though are very nice congratulation .

Comments are closed.