बातम्या

अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांबाबत तालिबानचा मोठा निर्णय

तालिबानने जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. लवकरच तालिबान त्यांच्या स्वतःच्या कायद्यानुसार राज्य करेल. दरम्यान, तालिबानने श्रीलंकेला आश्वासन दिले आहे की, त्यांच्या सरकार अंतर्गत अफगाणिस्तानातील बौद्ध स्थळांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

‘डेली मिरर’ नुसार, तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन म्हणाले की तालिबानचा LTTE म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमशी कोणताही संबंध नाही. आम्ही एक स्वतंत्र शक्ती आहोत आणि आम्ही आपला देश अफगाणिस्तानला परदेशी सुरक्षा दलांपासून मुक्त करण्यासाठी गेली 20 वर्षे लढत आहोत.दोहा येथून डेली मिररशी बोलताना शाहीन म्हणाले की तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतेक प्रमुख शहरांवर कब्जा केला आहे.

अफगाणिस्तानच्या बामियान खोऱ्यात जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती तालिबानने मार्च 2001 मध्ये नष्ट केली होती. बुद्ध मुर्त्या नष्ट केल्यानंतर जगभरातून तालिबानचा निषेध करण्यात आला होता. यामध्ये श्रीलंका निषेध करणाऱ्या देशांपैकी एक होता. आता अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबान सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुन्हा बौद्ध स्थळांना धोका निर्माण झाला आहे. ज्यामुळे जगातील सर्व बौद्ध राष्ट्रे चिंतित आहेत.

तालिबानच्या नेतृत्वाखालील सरकार अफगाणिस्तानातील जगप्रसिद्ध आणि इतर बौद्ध स्थळांना कुठलेही नुकसान होणार नाही, असा शाहीनने शब्द दिला आहे. मात्र, तालिबान अफगाणिस्तानातील कोणत्याही बौद्ध स्थळाचे कोणतेही नुकसान होणार नाही. या विधानावर तालिबान किती टिकतो हे फक्त वेळच सांगेल.

Source : https://www.dailymirror.lk