जगभरातील बुद्ध धम्म

बांगलादेशात संपूर्ण त्रिपिटक आता बंगाली भाषेत

बांगलादेश म्हणजे प्राचीन वंगप्रदेश. इथली भाषा बंगाली आणि मुस्लिम राजवटीमुळे वर्चस्व त्यांचेच. जो काही परंपरागत टिकून राहिलेला बौद्ध अल्पसंख्याक वर्ग आहे तो मात्र चिकाटीने आपले जीवन मार्गक्रमण करीत आहे. अशा या छोट्याशा देशात अल्पसंख्याक बौद्ध समाजा मध्ये संपूर्ण त्रिपिटक बंगाली भाषेत भाषांतरित करण्यात आले, ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे.

सन २००० मध्ये माननीय भन्ते सदानंद महास्थविर यांनी संपूर्ण त्रिपिटक बंगाली भाषेत भाषांतरित करण्याचे कार्य हाती घेतले होते. त्यांच्या पासून प्रेरणा घेऊन काही बौद्ध भिक्खू पाली भाषा शिकले. आणि त्यांनी भाषांतराचे प्रचंड काम पाली भाषा तज्ञ भन्ते प्रज्ञावंश महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले.

भाषांतरीत त्रिपिटकाचे एकूण २५ खंड झाले असून २५ ऑगस्ट २०१७ रोजी ते समारंभपूर्वक प्रसिद्ध करण्यात आले. बांगलादेशातील बौद्ध समाजात ही आनंददायी व स्फूर्तिदायक घटना आहे. या बंगाली पवित्र ( पबित्र) त्रिपिटकामुळे विहार, शाळा, विद्यापीठ, शैक्षणिक संस्था येथे अध्यायनाची सोय होणार आहे. या बंगाली त्रिपिटकला माझे त्रिवार वंदन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *