बातम्या

बुद्धाच्या ज्ञानाची आज जगाला नितांत गरज – -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करून जनतेला बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यासोबतच तथागतांना त्रिवार वंदन करून आपल्या शुभेच्छा संदेश दिला आहे.

काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात?

तथागत गौतम बुद्धांनी जगाला शांती, अहिंसा, समतेचा मार्ग दाखवला. आजच्या बुद्ध पौर्णिमेला तथागत बुद्धांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. तथागतांना जगाच्या दुःखाच्या मुळाचे व ते दूर करण्याचे ज्ञान प्राप्त झाले.मानवी जीवनाच्या उत्थानासाठी तथागत बुद्धांनी ध्यान मार्ग व तपश्चर्या केली.

त्यांच्या संबोधी– ज्ञानाची आज जगाला नितांत गरज आहे. बुद्धांची शिकवण अनुसरण्यातूनच आपण आज निर्माण झालेल्या मोठ्या संकटावरही मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो. त्यासाठी बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा आणि तथागत बुद्धांना त्रिवार वंदन!

-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे