बातम्या

१९६१ साली चोरीला गेली ब्रॉंझची बुद्धमूर्ती ५८ वर्षांनी मिळाली

पुरातन मौल्यवान वस्तूमध्ये सर्वात जास्त तस्करी ही बुद्धमूर्तींची होते. पाकिस्तान देशाचा यामध्ये पहिला नंबर लागतो. पाकिस्तान मधील असंख्य स्तूप, विहारे व संघाराम यांच्या बेकायदेशीर उत्खननात सापडलेल्या अगणित गांधार शैलीतील मूर्त्यांची तस्करी झालेली आहे.

पाश्चात्य देशांत दगडातील कोरीव मूर्त्यांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे त्यांना भरमसाठ किंमत मिळते. भारतातील नालंदा म्युझियम मधील बाराव्या शतकातील ब्रॉंझची बुद्धमूर्ती १९६१ साली चोरीला गेली होती. गेली ५७ वर्षे तिचा काही ठावठिकाणा नव्हता. मात्र पुरातन कलावस्तू गुन्हे शोध संस्थेला ( ARCA- Association for Research into Crimes against Art ) या वर्षी ती मूर्ती ब्रिटनमध्ये एका व्यापारी पेठेत मिळाली. तेथील उपनगर पोलीस प्रमुख सोफी हायस यांनी सांगितले की सदर मूर्ती भारतास परत करण्यात येईल. त्याप्रमाणे दोन महिन्यांपूर्वी ती मूर्ती भारतीय वकिलीतीस परत करण्यात आली.

परदेशात Ancient Art Market मध्ये बऱ्याच तस्करी झालेल्या पुरातन वस्तू मिळतात. त्यामध्ये बुद्धमूर्तींची मागणी खूप आहे. पाश्चात्य देशात काही ठिकाणी घरामध्ये, दुकानात, कार्यालयात ध्यानस्थ बुद्धमूर्ती असणे शुभकारक, लाभकारक मानले जात आहे. त्याचबरोबर युरोपियन देशात बुद्धांच्या विचारांचा प्रभाव ध्यान साधनेद्वारा ही वाढत आहे.

Source : theguardian

One Reply to “१९६१ साली चोरीला गेली ब्रॉंझची बुद्धमूर्ती ५८ वर्षांनी मिळाली

Comments are closed.