जगभरातील बुद्ध धम्म

पाकिस्तानातील या बुद्ध शिल्पाची इटलीतील पुरातत्व संशोधकांकडून दुरुस्ती

बौद्धस्थळे पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ पाकिस्तानात वाढतोय

सन २००७ मध्ये ‘तालिबान’ या अतिरेकी संघटनेने पाकिस्तान मधील स्वात खोऱ्यातील ‘जहानाबाद’ या शहराजवळील पर्वतातील ध्यानस्थ बुद्धमूर्तीची तोडफोड केली होती. मूर्तीच्या चेहऱ्यावर गोळ्यांचा वर्षाव तसेच डायनामाईटने स्फोट घडवीला होता.

गंधार आर्ट बद्दल विशेष आस्था असणाऱ्या इटली देशाला याचा धक्का बसला. सन २०१२ मध्ये त्यांनी पुरातत्व संशोधक ल्युका मारिया ओलीवेयरी यांना मूर्तीचा चेहरा पूर्ववत करण्यासाठी पाकिस्तानात धाडले. तसेच २.९ मिलियन डॉलर्सचा निधी सुपूर्द केला.

त्यानुसार २०१८ मध्ये मूर्ती पूर्ववत करण्याचे काम पूर्ण झाले. तेंव्हा पासून पर्यटकांचा ओघ पाकिस्तानात वाढला असून खास करून बौद्धस्थळे बघताना हे शिल्प बघण्यास अनेकजण येत आहेत. बौद्ध संस्कृती बाबत आस्था दाखविणाऱ्या व ती जतन करण्यास पुढाकार घेणाऱ्या ‘इटली’ देशाला सलाम.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *