जगभरातील बुद्ध धम्म

अमेरिका-युरोपातील लोक बुद्ध धम्माकडे आकर्षित होण्यामागचे ‘हे’ तीन प्रमुख कारणे

भगवान बुद्धाचे व्यक्तिमत्वच असे होते की, लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होत असत. बहुजनांच्या हितासाठी आणि सुखासाठी कल्याणकारी धम्माचा प्रसार करा असा आदेश दोन हजार पाचशे वर्षांपूर्वी भगवान बुद्धांनी भिक्खूंना दिला होता. आशिया खंडात बुद्ध धम्म फार झपाट्याने प्रसार झाला.

आशिया खंडातील सर्वच देशांत बुद्धधम्माला राजाश्रय मिळाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे जगातील निरनिराळ्या लोकांच्या पारंपरिक चालीरीतीत फारसा बदल न करता किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींनवर बंधने न घालता धम्माचे पालन करता येते.

आज अमेरिका आणि युरोप देशातील लोक मोठ्या प्रमाणात बुद्ध धम्माकडे आकर्षित होत आहेत. बुद्धांनी दिलेला माध्यम मार्ग आणि निर्माण केलेला संघ विनयशील असल्यामुळे लोकांवर त्याचा सहज प्रभाव पडतो.

बुद्ध धम्माचे आकर्षित होण्याचे तीन प्रमुख कारणे…

१) बुद्ध धम्माचा वैज्ञानिक दृष्टिकोन – बुद्ध धम्म स्वीकारण्यासाठी कोणतेही शारीरिक कष्ट अथवा कर्मकांड करण्याची गरज नाही.

२) धम्माची सहिष्णुता – बुद्ध धम्मचा अडीच हजार वर्षांपासूनचा इतिहास काढून पाहिला तर कधीही धर्मांतरासाठी जबरदस्ती अथवा छळ करण्यात आला नाही.

३) बौद्ध धम्मात व्यक्ति-विकासासाठी संपूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.

या तीन प्रमुख कारणांमुळे अमेरिका आणि युरोप देशातील सुज्ञ लोक बुद्ध धम्माकडे मोठ्याप्रमाणात आकर्षित होत आहेत.