जगभरातील बुद्ध धम्म

इंग्लंड मधील हा ओसाड किल्ला होणार बुद्ध विहार

ऑस्टिन किल्ला हा १८६३ साली इंग्लंड मधील प्लायमाऊथ येथे फ्रान्स पासून बचावासाठी इंग्रजांनी बांधला. सद्यस्थितीत हा किल्ला ओसाड पडलेला आहे. यास्तव स्थानिकांनी तसेच थाई कम्युनिटीने येथे बुद्ध विहार उभारण्याचे ठरविले आहे.

सिटी कौन्सिल यांनी थाई ब्रिटिश बुद्धिस्ट ट्रस्ट आणि थाई बुद्धिस्ट कम्युनिटी यांना परवानगी दिली असून त्या अनुषंगाने इथे भिख्खूंना राहण्यासाठी किल्ल्यातील खोल्यांचा वापर करता येईल. तसेच बैठकीची जागा, साधना कक्ष, कार्यालयासाठी जागा, व प्रार्थना हॉल रुपांतरीत करून देण्यात येणार आहे.

ऑस्टिन किल्ला

इथल्या मैदानात बौद्ध धार्मिक समारंभ सुद्धा आयोजित करण्यात येतील. तसेच येथे उद्यान उभे करण्यात येणार असून भाजीपाला व फळझाडे लावण्यात येतील. स्थानिक पोलिस प्रशासनाने सांगितले की या ओसाड किल्ल्याचा चांगला उपयोग होत असेल तर कोणाची हरकत नाही. इथे एप्रिल मध्ये थाई नववर्ष सोंगक्रण, मे मध्ये बुद्ध पोर्णिमा, ऑगस्टमध्ये थाईराणी यांचा वाढदिवस आणि ऑक्टोबरमध्ये चिवर दान समारंभ साजरा केला जाईल.

ब्रिटिशांसारखी उदारता भारतात बिलकूल पाहण्यात येत नाही. इथे खोटा अभिमान बाळगत जुन्या वास्तू वर्षानुवर्षे तशाच पडून राहतील. पण चांगल्या कामासाठी त्याचा वापर करणार नाहीत.

-संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)