बातम्या

लंडनमध्ये भारताचा बहुमान; ग्रेज इन कोर्टात बाबासाहेबांचे तैलचित्र!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमधील ज्या ‘ग्रेज इन’ कोर्टातून बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच आता डॉ. आंबेडकर यांचा एक खास फोटो लावून सन्मान करण्यात आला आहे. जिथून त्यांनी बॅरिस्टर पदवी मिळवली तिथेच त्यांचं तैलचित्र लावणं जाणं हा एक प्रकारे अवघ्या भारताचा बहुमान आहे.

ब्रिटिश राजकीय तज्ज्ञ, मानवाधिकार कार्यकर्ते आणि ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्डचे (राज्यसभा खासदार) सदस्य लॉर्ड डेव्हिड अल्टन यांनी ट्विटरवरून लंडनच्या ‘ग्रेझ इन’ ​​मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जा फोटो लावण्यात आला आहे, ते शेअर केलं आहे. यावेळी लॉर्ड डेव्हिड अल्टन यांच्यासमवेत बाबासाहेबांचे पणतू सुजात आंबेडकर हे देखील उपस्थित होते.

लॉर्ड डेव्हिड यांनी ह्यावेळी सुजात आंबेडकर यांना महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे, 21व्या शतकात त्यांनी भारताला जातीपातीच्या विळख्यातून बाहेर काढण्यास प्रयत्न करावेत. लंडनमधील ‘ग्रेज इन’ ही तीच जागा आहे जिथे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली बॅरिस्टर ही पदवी मिळवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑक्टोबर 1916 साली लंडनमधील ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला होता. सोबतच त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये देखील प्रवेश घेतला होता. जिथे त्यांनी अर्थशास्त्राच्या डॉक्टरेट थीसिसवर काम करणं सुरु केलं होतं आणि जो त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण देखील केला होता. त्यामुळेच त्यांना डॉक्टरेट ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती.