जगभरातील बुद्ध धम्म

व्हिएतनामचा टॅम चक पॅगोडा: असा सुंदर बुद्धिस्ट पॅगोडा तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा हे १० फोटो

टॅम चक पॅगोडा हा अध्यात्मिक पर्यटन संकुलाचा एक भाग असून जो पाच हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. त्यातील जवळजवळ एक पंचमांश भाग तलाव आणि बाकीचे बराचसा भाग पर्वतरांगा व दऱ्यांत पसरलेले दाट जंगल आहे. त्याच्या मध्यावर टॅम चक पॅगोडा आहे.
टॅम चक पॅगोडा येथे भेट देण्यासाठी बोटीद्वारे जाण्याचा मार्ग आहे.
टॅम चक पॅगोडा कडे बोटीमध्ये बसून जाताना वियतनामचे नैसर्गिक सौंदर्य तुम्हाला अनुभवता येईल.
10 व्या शतकात चिनी दक्षिणी हान राजवंशातून व्हिएतनाम देशाच्या मुक्ततेनंतर सत्ता मिळवणारे पहिले व्हिएतनामी सम्राट यांच्या पत्नीचे हे सुंदर टेम्पल आहे.
लूक एनगन लेकवरील हा एक पूल पर्यटकांना मोहित करतो. येथे गेल्यावर पर्यटकांचा आपोआप कॅमरा बाहेर येतो. इतके सुंदर लोकेशन पाहावयास मिळतात.
या परिसरात ताम क्वान गेट, क्वान अॅम टेम्पल, पिलर गार्डन, फाप चू टेम्पल, ताम द टेम्पल आणि पर्ल पॅगोडा अशी अनेक सुंदर बांधकामे आहेत. परिसरात फिरायला दीड ते दोन तास लागतात.
क्वान अॅम विहारात बोधिसत्व गुय्यानिनची 100 टन पितळी मूर्ती आहे. हा परिसर शिल्पकलेच्या आश्चर्यकारक कामांचे भांडार आहे.
टॅम चक पॅगोडाच्या भिंतींवर तथागत बुद्धांच्या कथा कोरीव काम करून दर्शिवण्यात आले आहेत.
टॅम टेम्पल हे 39 मीटर उंच आणि क्षेत्र 5,400 चौरस मीटर आहे. महत्त्वपूर्ण प्रसंगी ते ५००० लोक बसू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *