ब्लॉग

शेतीशी आणि मातीशी नाळ जुळलेला अधिकारी

डॉ.हर्षदिप कांबळे हे एक सनदी अधिकारी नसून ते एक उत्तम मातीशी जुळलं गेलेलं एक समीकरण आहे. हे त्यांच्या संवेदनशील वागणूकीतून दिसून येते.

एक आठवण अशी की, ते यवतमाळला जिल्हाधिकारी म्हणून जेव्हा रुजू झालेत तेव्हा त्यांच्या निवासी बंगल्यावर अनेक कामगार होते..घरकाम करणारी माणसें होती..घराच्या अंगणात फुलांची बाग त्यांना खूप आवडायची..विशेष गुलाब आणी मोगर्याची मोहक फुल त्यांना आवडायची.. सकाळी सकाळी लवकर उठून ते स्वता फुलांच्या कुंड्यात फुललेल्या गुलाबाच्या फुलं न्याहाळायचे..फुलदानीत पाणी घालायचे..फुलं आणि मूल यावर प्रेम करणारा अधिकारी म्हणून त्याची ख्याती आहे.

अशातच त्यांच्या घरकामात मदतनीस म्हणून सुर्यकांता एकनाथ राऊत नामक एक महिला बंगल्यावर कामाला होती. ..गरिबीचे तीला खूप बसले आणि तिने ते सोसले होते… परंतु जगण्याचं तत्त्वज्ञान मात्र ती शिकली डॉ हर्षदीप सर कडून…अक्षर ओळख नसलेली निरक्षर स्री..पण संसाराचा गाढा ओढणारी. तीची आपल्या कामावर प्रचंड ..गरिबीवर प्रेम करणारी ..आणी आपल्या मिळकतीच्या रोजीरोटीवर विश्र्वास ठेवणारी. सुर्यकांता सहसा बंगल्यावर कामाला आली कि,साहेब आवर्जून आणि आस्तेने विचारपूस करायचे कसे आहात तुह्मी? तेव्हा भीत भीत साहेब आहे म्हणून उत्तर देण्याचे काढायचं परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी म्हणून असलेले सनदी अधिकारी म्हणायचे मुला-बाळांना शिकवा त्यांना मोठा करा या परिस्थितीतून आपणास बाहेर यायचा आहे तेव्हा सुर्यकांताच्या डोळ्यांमध्ये आलेले अश्रू जिल्हाधिकाऱ्यांना बरेच काही शिकवुन गेले.

डॉ.हर्षदिप कांबळे यांना त्यांच्या आईची आठवण झाली ती तीच्या स्वभावाने..सुर्यकांताचा बेताचा,तडजोडीचा संसार पाहून कलेक्टर साहेब स्तब्ध झाले.. हा संवेदनशील मनाचा अधिकारी आजही त्यांच्या मनामध्ये मानवतेचे घर करून बसला आहे साहेबांच्या आठवणी काढल्यानंतर त्या आठवणीला ते आजही उजाळा देतात कोरणा सारख्या लोकांच्या काळात बंगल्यारच्या मजुरांची आठवण म्हणून त्यांनी पाठवलेली मुंबईवरून धान्याची मदत हातात देतांना साहेबांना आमचा नमस्कार सांगा! म्हणून पोटतिडिकेने सांगणारी सुर्यकांता आजही बंगल्यातल्या अनेक आठवणीने गहीवरुन जाते. हा अनुभव त्यांना भावनिक करून जाईल.

सुर्यकांताचं ते वाक्य अस्वस्थ करणारं होतं.. साहेब आमचं ईचवाचं बिराड पाठीवर असल्याची खंत ती आज व्यक्त करते.पण तुमच्यामुळे आह्मी आमच्या मुलांना शिकविण्याचा ध्यास घेतला आहे.
.बंगल्यामागची जागा बघून जिल्हाधिकारी डॉ कांबळे यांच्या मनामध्ये शेतीची संकल्पना जागृत झाली.. आणि सुरू झाली बंगल्यातील सेंद्रीय व बागायती शेती.शेती करुन जर भाजीपाला पिकविला आणि तेही जर बिनाखताचा भाजीपाला लावला तर हा आदर्श ठरेल.

सेंद्रिय शेती धोरण ठरलं..आणी मग मशागत सुरू झाली..बिनाखताचा भाजीपाला.काकडी,टमाटे,वांगी,कारली,भेंडी, पपइ सारं काही भरघोस पिक आल..
शेतात राबराब राबून जिल्ह्यातील पहिला बंगल्यातील शेती प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योग्य ती काळजी घेतली..सर्व मजूर लोक तिथूनच भाजीपाला घरी न्यायचे.आता घरी भाजीपाला मोफत ..कमावलेल्या घामाचा भाजीपाला..हा आनंद अतिशय सर्जनशील होता..आनंदी होता..बंगल्याचे नंदनवन झाले होते..पहिला पोळा हा बैलांचा सण, पण तो प्रथमच बंगल्यावर दोन बैलजोड्या सह साजरा झाला..आपली नाळ ही शेतकरी जीवनाशी आहे हे स्पष्ट झाले..आणी जिल्याचे अधिकारी पहिल्यांदाच इतके कामगारांशी सहमत..रममान होतांना पाहिले..

दिवाळी,दसरा आणि प्रत्येक सणाला साळी चोळीचा आहेर करून ममत्व बहाल करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आमचा सलाम आहे!

विजय मालखेडे
दैनिक पुढारी,जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ