लेणी

तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’

महाराष्ट्रात लेण्यांचे भांडार आहे. व त्यांच्या ठिकाणावरून प्रत्येक लेण्यांची नावे वेगवेगळी आहेत. मात्र हरेक ठिकाणी त्याला स्थानिक लोक पांडव लेणी म्हणतात. आता महाभारतातील पांडव या सर्व लेण्यांच्या ठिकाणी कसे राहिले असतील या प्रश्नाचा कोणी विचार करीत नाही. लेण्यांमध्ये स्तुप आहे, शिल्पे कोरलेली आहेत, ब्राम्हीलिपीतील माहिती आहे, तरीही रेटून पांडव लेणी म्हणायचे म्हणजे ‘आयत्या बिळावर नागोबा’ या म्हणी प्रमाणे ‘आयत्या लेण्यांवर पांडोबा’ असे म्हटले पाहिजे.

आपल्याकडे रूढ झालेली पद्धत डोळे मिटून पिढ्यानपिढ्या चालू राहते. चिकित्सा करायची नाही. सर्व भारतभर हेच चालू आहे. लेण्या, गुहा दिसल्या की डोळे मिटून म्हणायचे की ही पांडवांची जागा आहे. नुसता भारत नाही तर पाकिस्तानमध्ये सुद्धा तक्षशिला या पुरातन विद्यापीठ स्थळाजवळील एका जुन्या विहिरी जवळ पांडवांची विहीर म्हणून फलक लावला आहे. आता बोला….! पाकिस्तानी पुरातत्व खाते सुद्धा पांडवांच्या गोष्टीतून बाहेर आलेले नाही.

– संजय सावंत