बातम्या

आज संविधान जळते आहे, तेव्हा आपण काय करत आहोत? – लोकशाहीर संभाजी भगत

सोनी मराठी वाहिनीवर ‘जय जय महाराष्ट्र माझा’ कार्यक्रमात लोकशाहीर संभाजी भगत यांनी गाण्याच्या रूपात संविधानाचे स्मरण करून प्रत्येकाला संविधानाचे महत्व सांगितले. तसेच जेव्हा आज संविधान जळते आहे ,तेव्हा आपण काय करत आहोत?? स्वतःला विचारा असा प्रश्न गाण्याच्या माध्यमातून विचारला.

आज (सोमवारी) लोकशाहीर संभाजी भगत यांनी सोनी मराठी वाहिनीवरील स्वतः गायलेल्या गाण्याची क्लिप फेसबुकवर पोस्ट केली आहे.

स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांच्या रक्ताततून …आणिमहामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान सामाजिकआंदोलनातून …..आम्हाला संविधान मिळाले!!आम्ही युगानुयुगे गुलाम होतो,इतिहासात प्रथमच आम्ही माणूस झालो, ते संविधानामुळे…..!संविधानामूळे स्त्रियांचे शेणाचे हात पेनाला लागले !!पण ……आज संविधान जळते आहे ,तेव्हा आपण काय करत आहोत?? स्वतःला विचारा…..!!18 जुलैला आम्ही आमचे सांस्कृतिक पितामह लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जागवत… प्रिय बाबासाहेबाना वंदन करताना …संविधानाचे केलेले स्मरण एका गाण्याच्या रुपात ….!!ऐका आणि पहा….!!

Posted by Sambhaji Bhagat on Sunday, July 19, 2020

संभाजी भगत आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये काय म्हणाले…

स्वातंत्र्य संग्रामातील शहिदांच्या रक्ताततून …आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान सामाजिकआंदोलनातून …आम्हाला संविधान मिळाले!!

आम्ही युगानुयुगे गुलाम होतो,इतिहासात प्रथमच आम्ही माणूस झालो, ते संविधानामुळे…..!
संविधानामूळे स्त्रियांचे शेणाचे हात पेनाला लागले !!
पण ……

आज संविधान जळते आहे ,तेव्हा आपण काय करत आहोत?? स्वतःला विचारा…..!!
18 जुलैला आम्ही आमचे सांस्कृतिक पितामह लोकशाहीर कॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृती जागवत…प्रिय बाबासाहेबाना वंदन करताना …

संविधानाचे केलेले स्मरण एका गाण्याच्या रुपात ….!!
ऐका आणि पहा….!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *