बुद्ध तत्वज्ञान

बोधिसत्व म्हणजे काय?

बोधी’ म्हणजे महान ज्ञान आणि ‘सत्त्व’ म्हणजे प्राणी. ‘बोधिसत्त्व’ म्हणजे जो कधी ना कधी निश्चितपणे बुद्ध किंवा महाज्ञानी बनेल असा, बुद्धत्व प्राप्तीकरिता प्रयत्नशील माणूस, बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वी राजकुमार सिद्धार्थाला बोधिसत्त्वच म्हणत असत.

बोधिसत्त्वाला सतत दहा जन्मांपर्यंत ‘बोधिसत्त्व’ राहावे लागते. जन्म म्हणजे मानसिक परिवर्तन (जन्म म्हणजे कायेचा मृत्यू होऊन पुनःजन्म घेणे नव्हे) जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बुद्धधम्माची दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी म्हटले, ‘माझा पुनर्जन्म झाला आहे’. म्हणजेच मानसिक विचारांची क्रांती घडून आली आहे.)

पहिल्या जन्मी तो ‘मुदिता’ प्राप्त करून आपल्या चित्ताची शुद्धता दूर करतो व प्रमादरहित झाल्यावर त्याच्या मनात सर्व प्राणिमात्रांचा कल्याणाची उत्कट इच्छा उत्पन्न होते.

दुसऱ्या जन्मी विमला-भूमी अवस्थेला प्राप्त होऊन कामचेतनेपासून मुक्त होतो. तो सर्वांप्रती कारुणिक होतो.

तिसऱ्या जन्मी प्रभाकारी-भूमी प्राप्त झाल्यावर बोधिसत्त्वाची प्रज्ञा दर्पणासारखी स्वच्छ होते. तो अनात्म व अनित्यतेच्या सिद्धान्ताला पूर्णपणे समजून घेऊन त्यास आत्मसात करतो. उच्च प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी तो मोठ्यात मोठा त्याग करण्यास सिद्ध होतो.

चौथ्या जन्मी त अर्चिष्मती-भूमीला प्राप्त करतो. यावेळी त्याचे लक्ष अष्टांगिक मार्गावर केद्रित होते.

पाचवा जन्म तो सुदूर्जया – भूमीला प्राप्त करून सापेक्ष व निरपेक्षातील संबंधाला उत्तम प्रकारे आत्मसात करतो.

सहाव्या जन्मी अभिमुखी-भूमीला प्राप्त करून बोधिसत्व बारा निदाने आत्मसात करतो. अभिमुखी नावाच्या विद्येमुळे त्याच्या मनात अविद्याग्रस्त प्राण्यांप्रती असीम करण निर्माण होते.

सातव्या जन्मी बोधिसत्त्व दूरङ्गम – भूमी प्रप्त करतो. त्याला देशकालाचे बंधन राहत नाही, तो तृष्णामुवत होतो. तो दानशील, क्षमाशील, कुशल, वीर्यवान, बुद्धिमान आणि प्रज्ञावान होतो.

आठव्या जन्मी ‘अचल’ होऊन बोधिसत्त्व कृतकृत्य होतो. त्यांच्याकडून अनासायेच कुशल कर्म घडतात व तो प्रत्येक कामात सफल होतो.

नवव्या जन्मी साधुमती-भूमि प्राप्त करून बोधिसत्त्व सर्व धम्मप्द्धती, दिशा व काळाच्या सीमांना जिंकून पार करतो.

दहाव्या जन्मी बोधिसत्त्व ‘धम्म-मेधा’ बनतो. त्याला बुद्धाची दिव्य दृष्टी प्राप्त होते.

3 Replies to “बोधिसत्व म्हणजे काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *