ब्लॉग

श्रावण महिना काय आहे?

आषाढ आणि भाद्रपद यामधील महिना हा श्रावण म्हणून ओळखला जातो. आणि श्रावण याचा योग्य अर्थ बुद्ध गाथेचे मनन व चिंतन करणे, श्रवण करणे हा होय.

बौद्ध वर्षावास हा आषाढ पोर्णिमेपासून सुरू होतो. त्यानंतर पूर्ण श्रावण हा बौद्ध सुत्तांचे, त्रिपिटकाचे श्रवण करण्याचा, अभ्यास करण्याचा कालावधी असे. याला धम्म श्रावण म्हणतात. धम्म गाथेचे भिक्खुंकडून वाचन करवून घेणे व त्यांचे श्रवण करणे हेच श्रावण महिन्यातील समान्यजनांचे कार्य असे. श्रमणांच्या संस्कृतीचा हा महिना वर्षावासातील कळस आहे. सम्राट अशोकाने धम्म श्रावणासाठी अधिकारी नियुक्त केले होते. तसेच धम्म श्रावणासाठी पूर्ण सहकार्य बहाल केले होते.

काही शिलालेखावरून सम्राट अशोकाने श्रावणासाठी केलेले कार्य दिसून येते. प्राकृत श्रावणावरून संस्कृत श्रावणाचा विकास झाला. आणि संस्कृत श्रावण हे श्रमण विरोधी होते हे लक्षात घेतले की अनेक गोष्टींचा उलगडा होतो.

संजय सावंत, नवी मुंबई (लेखक – बौद्ध इतिहास अभ्यासक)

One Reply to “श्रावण महिना काय आहे?

Comments are closed.