बातम्या

जयभीम शॉर्ट व्हिडिओ ॲपची आवश्यकता का आहे? कधी लॉन्च होणार?

नागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात युवक युवतींना शॉर्ट व्हिडीओचे आकर्षण आहे. ही गरज लक्षात घेता विविध कंपन्यांनी युवक-युवतींना आपली कला सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. आता या यादीत नवीन ॲपची भर पडली आहे. ‘ जयभीम ‘ ॲपची घोषणा सीईओ गिरीश वानखेडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.

बहुचर्चित जयभीम शॉर्ट व्हिडीओ ॲप विषयी आवाज इंडिया टीव्ही चॅनलने नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने एक चर्चा सत्र आयोजित केले होते. या चर्चासत्रात राज्याचे उद्योग विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे, जयभीम ॲपचे सीईओ गिरीश वानखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आवाज इंडिया टीव्हीचे संपादक अमन कांबळे यांनी या चर्चासत्रात जयभीम शॉर्ट व्हिडीओ ॲप विषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. संपूर्ण चर्चासत्राचा व्हिडिओ खाली देण्यात आला आहे.

जयभीम ॲपच्या माध्यमातून युवक – युवतींना मनोरंजनासह उद्योगाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. शॉर्ट व्हिडीओ ॲप येत्या ५ डिसेंबर रोजी लॉन्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर जागतिक स्तरावर ॲपचे सादरीकरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. युवकांचे स्वप्न, ध्येय व आकांशा पूर्ण करण्यासाठी ॲप महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला.

सदर ॲपच्या टिझरचे लाँचिंग नुकतेच दुबई येथे इंटरनॅशनल मीडिया व सिने अभिनेत्यांच्या उपस्थितीत पार पडल्याची माहिती त्यांनी दिली. या ॲपच्या माध्यमातून देशातील ग्रामीणसह छोट्या शहरातील युवकांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यात येईल. ज्या युवकांचे व्हिडीओ व्हायरल होतील, त्यात उत्तम प्रतिसाद मिळणाऱ्यांना आर्थिक लाभ होणार असल्याचेही वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *