ब्लॉग

तिपिटक म्हणजे काय?

हा सर्वसाधारण माणसांपर्यंत न पोहचलेला किंवा पोहचवू न दिलेला जगातील सर्वात मोठा ग्रंथ आहे. हा तिपिटक ग्रंथ महाकारूनिक तथागत बुद्धांनी आपल्या उभ्या आयुष्यात जो काही अनुभव घेतला, संबोधी प्राप्त केली जागच्या, मानवतेच्या कल्याणासाठी केलेला शुद्ध उपदेश तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वानानंतर तीन महिन्याने भिक्खू संघाने तिपिटक लिहिण्यास सुरुवात केले. तिपिटक हा एक पुस्तिका नसून तीन तीन पेटी भरून असलेले बौद्ध उपदेशाचे ग्रंथ आहेत. तिपिटक हे महासागरासारखे आहे.

तथागतांच्या महापरिनिर्वानांनंतर तीन महिण्यानीच महास्थवीर महाकश्यपांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या पाचशे अरहंतांच्या संगतीत “धम्म” आणि “विनय” यांचे संगायन झाले. त्यानंतर १०० वर्षांनी महास्थविर “रेवत” यांच्या अध्यक्षतेत सातशे अरहंतांच्या उपस्थिततीत द्वितीय संगती घेण्यात आली.

तिसरी संगती बौद्ध सम्राट अशोकाच्या राज्यकाळात ‘मोग्गलीपुत्त तिस्स’ यांच्या अध्यक्षेत ‘थेरवाद’ तसेच बुद्धाचे वास्तविक मंतव्य निश्चित करण्यासाठी संपन्न झाली. या त्रितीय संगीतीनंतरच ‘अभिधम्मपिटक’ अस्तित्वात आले. यानंतरच्या संगतीमधून “तीपीटक” विकसित होत गेले.

“तीपीटक” हे जगातील सर्वात प्राचीन आणि पाहिले मानवीय समुदायाला लिखित स्वरूपातील धम्म ग्रंथ आहे. खरे तर बौद्ध धम्माचे संपूर्ण तत्वज्ञान “तीपीटकात” समाविष्ट आहे. “तीपीटकाचे” सुत्तपीटक, विनयपिटक, व अभिधम्मपिटक असे तीन विभाग आहेत. या तीन भागात होणारे तथागत बुद्धांच्या विचारांचं संग्रह आहे.

सुत्तपिटकात तथागत बुद्धांनी निरनिराळ्या वेळी केलेल्या उपदेशांचा संग्रह केला आहे. विनय पिटकात भिक्खू आणि भिक्खूनी यांच्या संघाच्या वागणुकीचे नियम दिलेले आहेत. अभिधम्मपिटकात बौद्ध धम्मातील गहन तत्वज्ञान विषयक प्रश्नांचा विचार केला आहे.

“तीपीटकातील” सर्व ग्रंथांचा परिचय सर्वसामान्यांना व्हावा यासाठी आदरणीय बौद्ध वाङ्मयाचे महापंडित राहुल सांक्रत्ययान यांनी हिंदी भाषेत करून दिला आहे. जगातील सर्वात प्राचीन आणि पाहिला ग्रंथ “तीपीटक” मानवजातीला मिळालेला हा एक मौल्यवान ग्रंथ आहे. हा “तीपीटक” ग्रंथ वाचाल तर बुद्ध, धम्म, संघ, यांचे महत्त्व समजेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *